Tuesday, February 18, 2025
Home बॉलीवूड Shaitaan Trailer Out: राक्षस घरी येणार अन्….’शैतान’चा ट्रेलर रिलीज

Shaitaan Trailer Out: राक्षस घरी येणार अन्….’शैतान’चा ट्रेलर रिलीज

अजय देवगनचा(Ajay Devgn) आगामी चित्रपट ‘शैतान’ची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अशातच या चित्रपटाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे या ट्रेलरमध्ये अजय देवगणची ऑनस्क्रिन मुलीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

अंगावर काटा आणणाऱ्या या ट्रेलरमध्ये अजय देवगण(Ajay Devgn) त्याची मुलगी आणि बायकोसोबत एका आलिशान घरात राहत असतो. अशातच एक अनोळखी माणूस त्यांच्या घरी येतो. आणि तो अजयच्या मुलीवर जादूटोणा करतो. पुढे माधवन (R Madhavan) जे भयंकर कृत्य सांगेल त्या कृत्यांचं पालन ती मुलगी करते. त्यामुळे सर्वांच्या मनात घबराट होते. अजय माधवनवर प्रचंड संतापतो. असे पाहायला मिळते. हा ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

गुजराती चित्रपट ‘वश’ चा ‘शैतान’हा हिंदी रिमेक आहे. क्रिश्नदेव याज्ञिक यांनी गुजराती चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. एक सामान्य कुटुंब व्हॅकेशनसाठी एका गावात जाऊन राहतं. तिथे एक अज्ञात माणूस येऊन त्यांच्या मुलीवर काळी जादू करतो. यादरम्यान कशा भयानक आणि विचित्र घटना घडतात हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

हा चित्रपट ८ मार्चला प्रदर्शित करण्यात येणार आहे. विकास बहल यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच अजय देवगन(Ajay Devgn), ज्योती देशपांडे, कुमार पाठक आणि अभिषेक पाठक यांनी निर्मिती केली आहे. या चित्रपटात अजय देवगन, ज्योतिका आणि आर माधवन(R Madhavan) हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

तर अजय देवगणच्या ऑनस्क्रिन मुलिची भूमिका २८ वर्षीय गुजराती अभिनेत्री जानकी बोडिवाला हिने साकारळी आहे. विशेष म्हणजे ओरिजनल गुजराती चित्रपटातही जानकीचीच भूमिका आहे. ती गुजराती सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Ameesha Patel: ‘मी विवाहीत’…अमीषा पटेलचा धक्कादायक खुलासा, कोण आहे पती?

Anil Kapoor Fitness: अनिल कपूर अजूनही का दिसतात तरुण ? सोनम कपूरने केला खुलासा

हे देखील वाचा