Friday, July 5, 2024

टी सिरीजचे मालक असलेल्या भूषण कुमार यांच्या अडचणींमध्ये वाढ, उच्च न्यायालयाकडून बलात्काराची केस रद्द करण्यास नकार

मुंबई हायकोर्टाने २६ एप्रिल रोजी टी-सिरीजचे मालक असणाऱ्या भूषण कुमार यांच्या विरोधात दाखल केल्या गेलेल्या बलात्काराच्या एफआयआरला कोर्टाने रद्द करण्यास नकार दिला आहे. कोर्टाने सांगितले की, तक्रारदार आता त्याच्या सहमतीने हे प्रकरण रद्द करण्यास तयार आहे, याचा अर्थ असा नाही की ही केस रद्द केली पाहिजे. एका महिलेने भूषण कुमार यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीला रद्द करण्यासाठी होकार दिला होता.

जुलै २०२१ रोजी भूषण कुमार यांच्या विरोधात ही बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली होती. आता ही तक्रार रद्द करण्याच्या कुमार यांच्या याचिकेवर कोर्टात सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने सांगितले की, “केवळ यासाठी की समोरचा पक्ष तक्रार रद्द करण्यासाठी तयार आहे, याचा अर्थ असा नाही की, त्यांच्या विरोधात असलेली बलात्काराची केस रद्द केली जावी. कोर्टाला एफआयआर मधील माहिती, साक्षी सर्व पाहावे लागेल आणि मग ठरवावे लागेल की हा अपराध किती मोठा आहे ते. एफआयआरमधील माहितीवरून तरी हे रिलेशन सहमतीने ठेवल्याचे दिसत नाही. आता या प्रकरणावर पुढील सुनावणी २ जुलै २०२३ रोजी होणार आहे.

उच्च न्यायालयाने तक्रार महिलेच्या सहमतीने खटला रद्द करण्यास सादर केलेले प्रतिज्ञापत्र आणि मॅजिस्ट्रेट कोर्टाने दिलेला आदेश यांचा अभ्यास केला. खंडपीठाच्या म्हणण्यानुसार, या सामग्रीवरून आरोपी आणि महिला यांच्यातील संबंध सहमतीने असल्याचे दिसून येत नाही.
या प्रकरणी कोर्टाने याचिकेला परवानगी देण्यास आणि प्रकरण रद्द करण्यास नकार दिल्यानंतर मुंदरगी यांनी याचिकेच्या समर्थनार्थ आणि अधिक पुरावे आणि माहिती सादर करण्यासाठी वेळ मागितला आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी २ जुलै २०२३ रोजी होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘बहरला हा मधुमास’ गाण्याची किली आणि निमा पॉलला भुरळ, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केले एक्सप्रेशनचे कौतुक

अमिताभ यांना ‘ती’ चूक पडलेली महागात; विनोद खन्नांना केले होते रक्तबंबाळ, आजही होत असेल पश्चाताप

हे देखील वाचा