Tuesday, June 10, 2025
Home बॉलीवूड आणखी एक दाक्षिणात्य चित्रपट जान्हवीकडून साईन; वडिलांनी केली घोषणा

आणखी एक दाक्षिणात्य चित्रपट जान्हवीकडून साईन; वडिलांनी केली घोषणा

बॉलिवूड गाजवल्यानंतर आता अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhavi kapoor) दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवण्यास सज्ज झाली आहे. लवकरच ती ‘देवरा’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, आता आणखी एक चित्रपट जान्हवीने साईन केला आहे. यासंदर्भात तिच्या वडिलांनी माहिती दिली आहे.

बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते. जान्हवीच्या कोणत्याही चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नसली तरी देखील ती नेहमीच लाइमलाइटमध्ये राहते. ‘देवरा’ या चित्रपटात कपूर ज्युनिअर एनटीआरसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटामध्ये काम करता करता जान्हवीच्या हाती आणखी एक साऊथ चित्रपट लागला आहे.

जान्हवी आता राम चरणच्या आगामी ‘आरसी 16’ चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. यासंदर्भात तिचे वडिल बोनी कपुर यांनी माहिती दिली आहे. बोनी म्हणाले, ‘माझ्या मुलीने यापूर्वीच ज्युनियर एनटीआरसोबत एक चित्रपट शूट केला आहे. ती लवकरच राम चरणसोबतही चित्रपट सुरू करणार आहे. रामचरण आणि ज्युनियर एनटीआर हे दोन्ही अभिनेते चांगले आहेत.

जान्हवी अनेक तेलुगु चित्रपट पाहत आहे आणि त्यांच्यासोबत काम करण्यास स्वतःला नशीबवाण समजतीय. मला आशा आहे की जान्हवीचा देवरा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडेल. जान्हवी लवकरच सूर्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. पत्नी श्रीदेवीची आठवण काढत ते म्हणाले, ‘श्रीदेवीनेही अनेक भाषांमध्ये अभिनय केला आहे, मला आशा आहे की माझी मुलगीही असच करेल.’

जान्हवी कपूरच्या देवरा चित्रपटाचे दिग्दर्शन कोरतला सिवा यांनी केले आहे. या चित्रपटाद्वारे जान्हवी कपूर तेलुगू चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट ५ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण आता या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

रामचरणच्या ‘आरसी 16’ चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर, याचे दिग्दर्शन बुची बाबू सना करणार आहेत. आरसी 16 मध्ये रामचरण व्यतिरिक्त जान्हवी कपूर आणि शिव राजकुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. कन्नड सुपरस्टार शिवा या चित्रपटातून तेलुगूमध्ये पदार्पण करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘माझी मुलगी मला कधी कधी ओरडते’, रवीना टंडनचा मुलगी राशाबद्दल खुलासा; काय आहे कारण?
सलमान खान नंतर आता कुटुंबासह त्याच्या बहिणीच्या नवऱ्यालाही कडक सुरक्षा; काय आहे कारण?

हे देखील वाचा