Thursday, April 18, 2024

श्रीदेवीची आठवण काढत बोनी कपूर भावूक; म्हणाले, ‘वाईट काळात माझी पत्नी माझ्यासोबत उभी राहिली’

चित्रपट निर्माते बोनी कपूर (Bonny Kapoor) नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपटसृष्टीला अनेक हिट चित्रपट देणाऱ्या या निर्माता-दिग्दर्शकाला अनेकदा अपयशालाही सामोरे जावे लागले आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान बोनी त्यांच्या करिअरमधील चढ-उतारांबद्दल आणि त्यांची दिवंगत पत्नी श्री देवी यांच्याबद्दलही मोकळेपणाने बोलताना दिसले.

एक काळ असा होता की, बोनी कपूर यांचे अनेक चित्रपट एकाच वेळी फ्लॉप झाले होते. या अपयशांमुळे त्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. एका मुलाखतीदरम्यान आपल्या वाईट दिवसांची आठवण करून देताना बोनी म्हणतात, “मला माहित होते की जर मी चूक केली असेल तर मला त्याचे परिणाम भोगावे लागतील. त्या दिवसांत मी खूप तणावात होतो, पण मला खात्री होती की एक दिवस मी या परिस्थितीतून बाहेर येईल. शेवटी, अपयशातून कोण जात नाही?”

बोनी पुढे सांगतात, “मी स्वत:वर विश्वास ठेवणे सोडून दिले होते तेव्हा श्रींनी माझ्यावर विश्वास दाखवला. ती माझ्या पाठीश उभी होती. मी हे पैसे कोणत्याही चुकीच्या मार्गाने खर्च केलेले नाहीत हे तिला माहीत होते. तिच्या विश्वासातून मला प्रोत्साहन मिळाले आणि मी त्या कठीण काळातून बाहेर पडलो. वाईट काळात मला साथ देणारे कुटुंब मिळाल्याबद्दल मी देवाचे आभार मानतो.”

बोनी कपूरचा महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘रूप की रानी चोरों का राजा’ बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. या चित्रपटात श्रीदेवीने अनिल कपूरसोबत काम केले होते. महागडे बजेट असलेला हा चित्रपट फ्लॉप ठरला आणि त्याचे परिणाम बोनी कपूर यांना भोगावे लागले. बोनी म्हणतात, ‘मी जेव्हा कठीण काळातून जात होतो, तेव्हा बॉलिवूडच्या अनेक फायनान्सर्सनी मला मनापासून मदत केली. त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी त्यांचा आभारी आहे. माणूस फक्त त्याच्या चुकांमधूनच शिकतो आणि मीही माझ्या चुकांमधून शिकलो आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सिद्धू मुसेवालच्या आईने दिला मुलाला जन्म, सोशल मीडियावर वडिलांनी शेअर केला फोटो
6 कोटींची कार खरेदी करूनही सायकल चालवताना दिसला कार्तिक; म्हणाला, ‘जुन्या सवयी सहजासहजी सुटत नाहीत’

हे देखील वाचा