शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी अभिनीत “ओ रोमियो” हा चित्रपट 13 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल भारद्वाज यांनी केले आहे. चित्रपटाच्या रिलीजपूर्वी गाण्यांमुळे चांगली चर्चा झाली. मात्र, ॲडव्हान्स बुकिंग तितकी चांगली झाली नव्हती. पण सध्याच्या कामगिरीकडे पाहता, बॉक्स ऑफिसवर ओ रोमियोची चांगली सुरुवात आहे SACNILC च्या सुरुवातीच्या अंदाजानुसार, चित्रपट सुमारे 8-10 कोटी कमाई करेल. संध्याकाळ आणि रात्रीच्या शोमध्ये जास्त लोक चित्रपट पाहिले तर 10 कोटी पर्यंत पोहोचू शकतो.
निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या बजेटची अधिकृत घोषणा केलेली नाही. तरी, काही अहवालांनुसार ओ रोमियो 125-150 कोटी बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. त्यामुळे, चित्रपटासाठी 8-10 कोटींची ओपनिंग ही एक चांगली सुरुवात असेल.
पण शाहिदचा मागील चित्रपट देवा पेक्षा ओ रोमियोची चांगली सुरुवात आहे. देवा या चित्रपटांने पहिल्या दिवशीची बॉक्स ऑफिस कमाई हि 5.5 कोटी इतकी होती. तर शाहिदच्या २०२४ मध्ये आलेल्या अमित जोशी दिग्दर्शित “तेरी बातें में ऐसा उलझा जिया” आणि आराधना शाह दिग्दर्शित चित्रपटालाही मागे टाकले, ज्याने पहिल्या दिवशी 6.7 कोटी कमावले. सॅकनिल्कच्या मते, गौतम तिन्नानुरी दिग्दर्शित २०२२ मध्ये आलेल्या त्यांच्या “जर्सी” या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 3.2 कोटी कमावले.
‘ओ रोमियो या चित्रपटाची निर्मिती नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने यांनी केली आहे. निर्मात्यांच्या मते, हा चित्रपट एका अत्यंत भावनिक आणि अशांत कथेवर आधारित आहे ‘ओ रोमियो’ हा चित्रपट लेखक हुसेन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकातील एका प्रकरणापासून प्रेरित आहे, जो शाहिदने (Shahid)साकारलेल्या गँगस्टर हुसेन उस्ताराची रोमांचक कहाणी सांगतो. तर या चित्रपटात विक्रांत मेसी, तमन्ना भाटिया, अविनाश तिवारी, दिशा पटानी, फरीदा जलाल आणि नाना पाटेकर यांच्यासह इतर कलाकार देखील आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘तू या मैं’ पाहून प्रेक्षकांना आठवला रेखाचा तो चित्रपट, ज्या मध्ये मगरने केला होता कहर










