Monday, July 1, 2024

पहिल्याच दिवशी ‘सालार’ची छप्परफाड कमाई, तर ‘अशी’ आहे इतर चित्रपटांची अवस्था

2023 च्या शेवटच्या महिन्यात बॉक्स ऑफिसवर चांगलीच उत्सुकता आहे. डिसेंबरमध्ये आतापर्यंत अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, जे उत्तम कलेक्शन करत आहेत. सालार या बहुप्रतिक्षित चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. त्याचबरोबर शाहरुख खानचा डंकी हा चित्रपटही थिएटरमध्ये दाखल झाला आहे. याशिवाय अॅक्वामन 2, सॅम बहादूर आणि अॅनिमल हे चित्रपटही थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहेत.

लोक खूप दिवसांपासून प्रभासच्या सालारची वाट पाहत होते. प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. याचा परिणाम असा झाला की चित्रपटाच्या कलेक्शनने जवानला मागे सोडले. पहिल्या दिवशी चित्रपटाने सर्व भाषांमध्ये मिळून 95 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

शाहरुख खानचा डंकी देखील लोकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. सालार रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण झाली. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 29.2 कोटींचा व्यवसाय केला. यासोबतच चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 20 कोटींची कमाई केली आहे. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन 49.2 कोटी झाले आहे.

या आठवड्यात हॉलीवूडचा एक्वामॅन अँड द लॉस्ट किंगडम हा चित्रपटही थिएटरमध्ये दाखल झाला आहे. अनेक मोठे चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे त्याची सुरुवात संथ झाली. या चित्रपटाने पहिल्या दिवशी तीन कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी या चित्रपटाने 1 कोटी 47 कोटींचा गल्ला जमवला होता. यासह चित्रपटाचा एकूण व्यवसाय 4 कोटी 47 लाखांवर पोहोचला आहे.

रणबीर कपूरचा ऍनिमल हा या वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. या चित्रपटाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. मात्र, संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित या चित्रपटाची कमाई कालांतराने मंदावली आहे. शुक्रवारी चित्रपटाने 1 कोटी 15 लाखांची कमाई केली. यासह चित्रपटाचे एकूण कलेक्शन आता 532.44 कोटींवर पोहोचले आहे.

विकी कौशल स्टारर सॅम बहादुर या चित्रपटाने लोकांची मने जिंकली आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने चांगली कमाई करत आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटाने 22 व्या दिवशी एक कोटींचा व्यवसाय केला. यासह चित्रपटाची एकूण कमाई आता ८२.९ कोटींवर पोहोचली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘मैने प्यार किया’च्या पोस्टर शूटदरम्यान भाग्यश्री होती प्रेग्नंट, सलमान खानने केलेली अशी मस्करी
वैष्णोदेवीला दर्शनासाठी पोहचलेल्या एल्विश यादवला स्थानिकांनी केली मारहाण, जाणून घ्या कारण

हे देखील वाचा