Thursday, April 25, 2024

ट्विटरवर ट्रेंड होतंय बॉयकॉट ‘लाल सिंग चड्ढा’, पण का होतोय आमिर खानच्या चित्रपटाला विरोध?

हिंदी चित्रपटसृष्टीतील दमदार कलाकार आमिर खानचा (Aamir Khan) आगामी चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ रिलीझपूर्वी अडचणीत सापडला आहे. खरं तर, गेले काही महिने बॉलिवूडसाठी खास गेलेले नाहीत. सोशल मीडियावर बहुतांश चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. अशातच आमिर खान आणि करीना कपूरचा (Kareena Kapoor) ‘लाल सिंह चड्ढा’ देखील अडकला आहे, ज्याच्या अंतर्गत बॉयकॉट लाल सिंह चड्ढा ट्विटरवर ट्रेंड करत आहे. अखेर यामागचे कारण काय आहे, जाणून घेऊया.

‘यामुळे’ होतोय ‘लाल सिंह चड्ढा’चा विरोध
११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणारा बॉलिवूड सुपरस्टार आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा हॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ची कॉपी आहे, ज्याचा हिंदीमध्ये रिमेक करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, बॉलिवूडच्या मोठ्या स्टार्सद्वारे चित्रपटाची कॉपी करणे लोकांना आवडले नाही आणि ते ‘लाल सिंग चड्ढा’वर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. (boycott laal singh chaddha trends on twitter)

‘लाल सिंग चड्ढा’ यांच्या विरोधाचे हे एकमेव कारण नाही. याशिवाय आमिर खानने भारतीय सभ्यता आणि संस्कृतीबद्दल यापूर्वी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे ट्विटरवर ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटावर बहिष्कार टाकला जात आहे. एवढेच नाही, तर आमिर खानची पूर्व पत्नी किरण राव (Kiran Rao) हिने देशाप्रती केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे लोक ‘लाल सिंह चड्ढा’ला लक्ष्य करत आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
‘लाल सिंग चड्ढा’वर बहिष्कार टाकण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून ट्विटरवर सुरू आहे. ज्या अंतर्गत आमिर खानच्या चित्रपटावर त्याचा मोठा प्रभाव पडू शकतो, असे दिसते. इतकंच नाही, तर अनेक ट्विटर युजर्स या चित्रपटाविरोधात आवाज उठवत आहेत आणि आपलं मतही मांडत आहेत. ज्या अंतर्गत एका ट्विटर युजरने ट्विट करून लिहिले आहे की, ‘तुम्हाला तुमच्या धर्माचे रक्षण करायचे असेल तर लाल सिंह चड्ढावर बहिष्कार घाला.’ याप्रमाणे बरेच ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा