Friday, April 19, 2024

ऑगस्टमध्ये बॉक्स ऑफिसवर राडा होणार फिक्स! रक्षाबंधन ते लायगर, रिलीजसाठी ‘हे’ सिनेमे सज्ज

पुढील महिना बॉक्स ऑफिसवर मनोरंजनाने भरलेला असणार आहे. ऑगस्टमध्ये ५ मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. आमिर खान याच्या बहुप्रतिक्षित ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटापासून ते विजय देवरकोंडा याच्या बॉलिवूड पदार्पणाचा ‘लायगर’ आणि आलिया भट्ट हिच्या थरारक मनोरंजक ‘डार्लिंग्स’ या चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटात ऍक्शनपासून फॅमिली ड्रामापर्यंत सर्व काही ऑगस्टमध्ये पाहायला मिळणार आहे.

डार्लिंग्स
अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिचा ‘डार्लिंग्स’ चित्रपट जबरदस्त चर्चेत आहे. आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकणारी आलिया आपला नवा प्रवास सुरू करत आहे. ‘डार्लिंग्स’ (Darlings) नेटफ्लिक्सवर ५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. ‘डार्लिंग्स’ हा डार्क कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. मुंबईत आपली जागा मिळवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या आई-मुलीचे जीवन या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात आलिया मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ????☀️ (@aliaabhatt)

लाल सिंग चड्ढा
अभिनेता आमिर खान (Aamir Khan) याच्या ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) चित्रपटाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. हा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होत आहे. अद्वैत चंदन हे ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. ट्रेलरमधील आमिरच्या अतुलनीय परिवर्तनाने चाहत्यांना आकर्षित केले आणि ११ ऑगस्ट रोजी चित्रपट प्रदर्शित होत असल्याने चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

रक्षा बंधन
‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटासोबतच अक्षय कुमार (Akshay Kumar) याचा ‘रक्षा बंधन’ (Raksha Bandhan) पण प्रदर्शित होणार आहे. आनंद एल राय दिग्दर्शित हा चित्रपट एक सामाजिक संदेश देणार आहे. हा चित्रपट रक्षाबंधनच्या मुहूर्तावर म्हणजेच ११ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. एकाच वेळी दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाल्याने चाहत्यांना वीकेंडला बोनस मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

दोबारा
अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) लवकरच अनुराग कश्यप याच्या ‘दोबारा’ (Dobaaraa) या चित्रपटात दिसणार आहे. ‘दोबारा’ हा एक सायन्स-फिक्शन थ्रिलर चित्रपट आहे, जो २०१८ मध्ये आलेल्या ‘मिराज’ या स्पॅनिश चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटाची निर्मिती शोभा कपूर आणि एकता कपूर (बालाजी टेलिफिल्म्स, कल्ट मूव्हीजची नवीन शाखा), सुनीर खेतरपाल आणि गौरव बोस (एथेना) यांनी संयुक्तपणे केली आहे. हा १९ ऑगस्टला जगभरातील चित्रपटागृहात प्रदर्शित होणार आहे.

लायगर
दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) याच्या ‘लायगर’ (liger) या चित्रपटातून दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित, ‘लायगर’ ही एमएमए फायटरची कथा आहे. या चित्रपटात विजयसोबत अनन्या पांडे मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

हा चित्रपट २५ ऑगस्ट रोजी ५ वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात माईक टायसनचीही महत्त्वाची भूमिका आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘लायगर’चा ट्रेलरने चाहत्यांना लावलं याड, अभिनेत्याला कुणी घातला दुधाने अभिषेक; तर कुणी बनवला टॅटू
‘मला नाही राहायचं!’ १३ महिन्यांनंतर ‘इतक्या’ कोटींचं नुकसान सोसत अर्जुनने विकला मलायकाच्या बिल्डिंगमधला फ्लॅट
‘नेक्स्ट टाईम एकदाच सांगेन…’, फोटोग्राफर्सने हद्द पार करताच भडकला साऊथ सुपरस्टार

हे देखील वाचा