Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड ट्रोलर्सच्या नाकावर टिच्चून पहिल्याच आठवड्यात ‘ब्रह्मास्त्र’ची विक्रमी कमाई; आलिया म्हणाली…

ट्रोलर्सच्या नाकावर टिच्चून पहिल्याच आठवड्यात ‘ब्रह्मास्त्र’ची विक्रमी कमाई; आलिया म्हणाली…

बाॅलिवूडची प्रसिद्ध जाेडी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट रूपेरी पडद्यावर रिलीज हाेऊन एक आठवडा झाला आहे. चित्रपटाला चाहत्यांचा आणि क्रिटिक्सचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाच्या वीएफएक्सची प्रशंसा हाेत आहे. साेशल मीडियावर बाॅयकाॅटचा ट्रेंड चालू असतानाही त्याचा परिणाम चित्रपटावर पडला नाही. चित्रपटाने बाॅक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. चित्रपटाने भारतातच नाही, तर विदेशातही विक्रमी कमाई केली आहे. 

आलियाने चाहत्यांचे मानले आभार
अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिने पहिल्या आठवड्यातील जगभरातील कमाईवर आंनद व्यक्त केला आहे. आलियाने चाहत्यांना सांगितले की, ‘ब्रह्मास्त्र पार्ट वनः शिवा’ने जमभरात एकूण 300 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. पहिल्या आठवड्यातील या दमदार कमाईने जगभरातील रेकाॅर्ड मोडले आहेत. यासाठी आलियाने चाहत्यांचे आभार मानले असून यासंबंधी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

बाॅक्स ऑफिसवर एकूण 300 कोटी रुपयांची दमदार कमाई
या व्हिडिओमध्ये ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra Part One: Shiva) याचे आश्चर्यदायक दृश्य पाहायला मिळते. व्हिडिओमध्ये एका ठिकाणी लिहिले आहे की, “पहिला आठवड्यात जगभरातील बाॅक्स ऑफिसवर एकूण 300 कोटी रुपयाची कमाई.” यावरून स्पष्ट हाेते की, चित्रपटाला भारताव्यतिरिक्त परदेशातही चांगलीच पंसती मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ????☀️ (@aliaabhatt)

आलिया भट्टने व्हिडिओ शेअर करत, हात जाेडलेल्या इमाेजीसह ब्सास्ट आणि फायर इमाेजी कॅप्शनमध्ये टाकले आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात आलिया भट्टशिवाय रणबीर कपूर, अमिताभ बच्चन, मौनी रॉय, डिंपल कपाडिया आणि नागार्जुन महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
भांडं फुटलं की! सोनाक्षी ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात; वरुणही म्हणाला, ‘याला म्हणतात ब्लॉकबस्टर जोडी’
‘बंद होण्याच्या मार्गावर होती कन्नड इंडस्ट्री, केजीएफ बनवून रचला इतिहास’, मांजरेकरांनी गायलं गुणगान
लहाणपणी सलवारमध्ये अशी दिसायची सारा, आत्याने शेअर केलेला फोटो पाहून बसणार नाही विश्वास…

हे देखील वाचा