Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड बहुप्रतिक्षित ब्रह्मास्त्र सिनेमाचा टिझर अखेर प्रदर्शित, रणबीर आलियापेक्षा मौनी रॉयच्या लूकने वेधले लक्ष

बहुप्रतिक्षित ब्रह्मास्त्र सिनेमाचा टिझर अखेर प्रदर्शित, रणबीर आलियापेक्षा मौनी रॉयच्या लूकने वेधले लक्ष

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा बहुप्रतिक्षित आणि बहूचर्चित अशा ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाचा ‘टिझर’ प्रदर्शित केला गेला आहे. सोबतच या सिनेमाच्या ट्रेलर लाँचची तारीख देखील जाहीर करण्यात आली. हा टिझर प्रदर्शित झाल्या झाल्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या काही सेकंदाच्या ट्रेलरमधून चित्रपटातील सर्वच मुख्य कलाकारांना दाखवले असून त्यांचा हटके लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. टीझरमध्ये सर्वांनाच आगीच्या ज्वाळांमध्ये दाखवले गेले आहे. या टीझरनंतर आता चित्रपटाबद्दल लोकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

टीझरमध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूर खूपच छान दिसत आहे. तर मौनी रॉयचा लूक जरा घाबरावणारा दिसत आहे. हा टिझर पाहिल्यानंतर मौनी या सिनेमात नकारात्मक भूमिकेत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तत्पूर्वी निर्मात्यांनी एक प्रोमो व्हिडिओ प्रदर्शित करत सिनेमाच्या ट्रेलर प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या टीझरमधून मौनी रॉय आणि नागार्जुन यांच्या लुकचा देखील खुलासा करण्यात आला आहे. या टीझरमधून रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आदी सर्वच कलाकारांना दाखवण्यात आले आहे.

या व्हिडिओच्या शेवटी रणबीर कपूरचा आवाज येतो आणि तो म्हणतो, “अब खेल शुरू।’ अर्थात “आता खेळ सुरु झाला आहे.” या सिनेमाचा ट्रेलर १५ जून रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. मात्र त्याआधी हा टिझर प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमधून एक गोष्ट स्पष्ट दिसून येते की, निर्मात्यांनी या सिनेमामध्ये मोठ्या प्रमाणावर स्पेशल इफेकट्सचा वापर केला आहे. या सिनेमाच्या संबंधित सर्व लोकांनी हा टिझर त्यांच्या सोशल मीडियावरून शेअर केला आहे.

टीझरमध्ये रणबीर कपूर जळत्या कोळश्यावरून चालताना दिसत असून, आलिया भट्ट सूर्याच्या किरणांमध्ये दिसत आहे. तर अमिताभ बच्चन विजेच्या समोर उभे दिसत आहे. नागार्जुन खुल्या वातावरणात उभा असून मौनी रॉय काळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये आगीच्या ज्वाळांसोबत खेळताना दिसत आहे. हा सिनेमा येत्या ९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

या टीझरमध्ये शाहरुख खानची देखील झलक दिसत असल्याच्या चर्चा सुरु आहे. या ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या टीझरमध्ये एका पाठमोऱ्या आकृतीला नेटकाऱ्यानी शाहरुख खान सांगितले आहे. मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा