Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

राज कुंद्राने अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या नावावर केला कोट्यवधींचा ‘किनारा’ बंगला, जाणून घ्या किंमत

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अश्लील चित्रपट प्रकरणात अटक झाल्यापासून चर्चेत आहे. राज कुंद्राला गेल्या वर्षी जुलैमध्ये अश्लील चित्रपट प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. २ महिने तुरुंगात राहिल्यानंतर बराच संघर्ष करून त्याला जामीन मिळाला होता. राज गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये तुरुंगातून बाहेर आला होता. नुकताच राजने आपला जुहूचा बंगला शिल्पाच्या नावावर केल्याचे वृत्त समोर आहे. ज्याची किंमत करोडोंची आहे.

शिल्पा शेट्टीचा ‘किनारा’

राज कुंद्राचे (Raj Kundra) खरे नाव रिपू ​​सुदान कुंद्रा आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, त्याने मुंबईतील आपल्या ‘किनारा’ या बंगल्याचा संपूर्ण पहिला मजला पत्नी शिल्पाच्या (Shilpa Shetty) नावावर ट्रान्स्फर केला आहे, ज्यात ५ फ्लॅट आहेत. या मालमत्तेची किंमत ३८.५ सांगितली जात आहे. जुहू येथील या बंगल्यात ते कुटुंबासह राहतात.

हा बंगला समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे ३०० मीटर अंतरावर आहे बांधलेला

माध्यमांतील वृत्तानुसार, राज कुंद्राची ही संपत्ती ३८.५ कोटींची आहे. जी त्याने आता शिल्पाच्या नावावर ट्रान्सफर केली आहे. शिल्पाचा जुहू हा बंगला ५,९९५ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. त्यांचा बंगला समुद्रकिनाऱ्यापासून ३०० मीटर अंतरावर बांधला आहे.

शिल्पा १.९ कोटी रुपये भरले स्टॅम्प पेपरसाठी

ट्रान्स्फर मार्केटच्या मूल्यानुसार, या भागातील मालमत्तेची किंमत ६५,०००० चौरस फूट आहे आणि त्याच मार्केट मूल्यानुसार, शिल्पाने या फ्लॅटसाठी स्टॅम्प पेपरसाठी १.९ कोटी रुपये भरले आहेत. कागदपत्रांनुसार, त्याची नोंदणी २१ जानेवारी २०२२ रोजी झाली होती.

राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी यांचे २००९ मध्ये झाले लग्न

शिल्पा शेट्टीने २००९ मध्ये बिझनेसमन राज कुंद्रासोबत लग्न केले. त्यानंतर ती अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली. अश्लील चित्रपट प्रकरणात अडकल्यानंतर राज कुंद्राला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपासून दूर करण्यात आले आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर शिल्पा शेट्टी शब्बीर खानच्या आगामी ‘निकम्मा’ या चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा