Thursday, April 25, 2024

प्रियांका चोप्रा-निक जोनासपासून शिल्पा शेट्टी-राज कुंद्रापर्यंत, ‘हे’ कलाकार सरोगसीद्वारे बनले पालक

अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा पती निक जोनास (Nick Jonas) शुक्रवारी (२१ जानेवारी) सरोगसीद्वारे पालक बनले आहेत. या जोडप्याने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करून त्यांच्या चाहत्यांना याबद्दल माहिती दिली. निकला टॅग करत प्रियांकाने लिहिले की, “आम्ही सरोगसीद्वारे आमच्या बाळाचे स्वागत केले आहे हे जाहीर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आम्ही आमच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित करण्यासाठी, या विशेष काळात गोपनीयतेची आदरपूर्वक मागणी करतो. तुमचे खूप खूप आभार.”

प्रियांका-निक यांच्या आधीही अनेक बॉलिवूड जोडपे आपल्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी आयव्हीएफ आणि सरोगसीच्या माध्यमातून पालक बनले आहेत. चला तर मग या यादीवर एक नजर टाकूया.

प्रीती झिंटा-जीन गुडइनफ
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने (Preity Zinta) अलीकडेच जाहीर केले की, ती आणि तिचा पती, आर्थिक विश्लेषक जीन गुडइनफ सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचे पालक बनले आहेत. प्रीतीने आपल्या मुलाचे नाव जय आणि मुलीचे नाव जिया ठेवले आहे.

शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने (Shilpa Shetty) २०२० मध्ये सरोगसीद्वारे तिच्या दुस-या मुलीचे, समिशाचे स्वागत केले. याआधी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा मुलगा विआनचे आई-वडील झाले आहेत.

करण जोहर
दिग्दर्शक-निर्माता करण जोहर (Karan Johar) सरोगसीद्वारे यश आणि रुही या जुळ्या मुलांचा पिता झाला आहे. करण जोहरच्या जुळ्या मुलांचा जन्म फेब्रुवारी २०१७ मध्ये झाला होता.

आमिर खान-किरण राव
आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव यांनी २०११ मध्ये आयव्हीएफच्या माध्यमातून त्यांचा मुलगा आझादचे स्वागत केले. इतकंच नाही, तर आमिरने लोकांना आयव्हीएफ आणि सरोगसी करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.

शाहरुख खान-गौरी खान
शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि गौरी खान (Gauri Khan) यांचा धाकटा मुलगा अबरामचा जन्म २०१३ सरोगसीद्वारे झाला.

सोहेल खान- सीमा खान
पहिल्या मुलाच्या जन्मानंतर दहा वर्षांनी सीमा आणि सोहेल खान (Sohail Khan) यांनी दुसरे मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला. जेव्हा हे नैसर्गिकरित्या होऊ शकत नाही. तेव्हा तिला वैद्यकीय मदत घ्यावी लागली आणि आयव्हीएफ सरोगसीचा पर्याय निवडला. त्यांचे दुसरे अपत्य योहानचा जन्म त्यांच्या लग्नाच्या जवळपास १३ वर्षांनी म्हणजे जून २०११ मध्ये झाला.

फराह खान
फेब्रुवारी २००८ मध्ये फराह (Farah Khan) ४३ वर्षांची होती जेव्हा त्यांना तीन मुले होती. तिने एका निवेदनात म्हटले आहे की, आयव्हीएफ हा एक वरदान आहे आणि त्यामुळे माझे आयुष्य बदलले, म्हणून मी खरोखर आभारी आहे.

तुषार कपूर
सरोगसीच्या माध्यमातून तुषार (Tusshar Kapoor) एका मुलाचा एकल पालक झाला. त्याच्या मुलाचा जन्म जून २०१६ मध्ये झाला होता. तुषार अजूनही अविवाहित आहे आणि तो त्याच्या मुलासाठी आई आणि वडील दोघांची भूमिका करत आहे.

एकता कपूर
निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) जानेवारी २०१९ मध्ये सरोगसीद्वारे तिचा मुलगा रवीची सिंगल मदर बनली. तिचा भाऊ तुषारचा मुलगा लक्ष्य याचीही ती एक प्रेमळ आत्या आहे.

सनी लिओनी-डॅनियल वेबर
सरोगसीचा पर्याय निवडल्यानंतर, अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) आणि तिचा पती डॅनियल वेबर यांना जुळी मुले झाली आहेत. २०१८ मध्ये जुळ्या मुलांचा जन्म झाला.

श्रेयस तळपदे-दीप्ती तळपदे
अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि त्याची पत्नी दीप्ती यांनी २०१८ मध्ये सरोगसीद्वारे पालकत्व स्वीकारले. या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव आद्या ठेवले आहे. सरोगसीचा पर्याय निवडण्यापूर्वी या जोडप्याच्या लग्नाला १४ वर्षे पूर्ण झाले होते.

लिसा रे-जेसन डेहनी
अभिनेत्री लिसा रे आणि तिचा पती जेसन डेहनी यांनी जून २०१८ मध्ये सरोगसीद्वारे त्यांच्या जुळ्या मुलींचे – सुफी आणि सोलीलचे स्वागत केले.

हेही वाचा :

हे देखील वाचा