Tuesday, August 5, 2025
Home बॉलीवूड फाटलेल्या ड्रेसचा फोटो शेअर करत गहनाचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप; म्हणाली, ‘पोलिसांनी माझी दुर्दशा…’

फाटलेल्या ड्रेसचा फोटो शेअर करत गहनाचा मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप; म्हणाली, ‘पोलिसांनी माझी दुर्दशा…’

गेल्या कित्येक दिवसांपासून अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्राच्या संबंधित पाॅर्नोग्राफी प्रकरण सूरू आहे. यात अनेक अभिनेत्रीचा हात असल्याचेही म्हटले जात आहे. तसेच अनेक अभिनेत्रींची कसून चौकशी करण्यात आली. अभिनेत्री गहना वशिष्ठ वरही पाॅर्नोग्राफी प्रकरणातील आरोपी आहे. आता तिने स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करून मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. फोटोमध्ये गहनाचे कपडे फाटलेले दिसत आहेत, तर त्यात तिचा चेहरा दिसत नाही. गहनाने मुंबई पोलिसांनी फसवण्याचा आणि तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.

गहनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन स्वतः चे मत व्यक्त केले आहे. गहनाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती फाटलेल्या कपड्यांमध्ये दिसत आहे. यासाठी ती मुंबई पोलिसांना दोष देत आहे. तिने फोटोसह एक लांबलचक पोस्टही लिहिली आहे. ती लिहिले की, “पोलिसांनी माझी ही दुर्दशा केली आहे. सर्व खाती बंद करण्यात आली आहेत, पैसेही नाहीत, घरीही जाऊ शकत नाही. जर घरी गेले, तर पोलीस अटक करतील. माझा मोबाईल, लॅपटॉप सर्व काही घेतील. जामिनासाठी गाडी गहाण ठेवली आहे. मी काही अनोळखी लोकांसोबत राहत आहे. वकिलाची फी इतरांकडून मागून दिली आहे. मुंबई पोलीस, तुम्ही यापेक्षा जास्त कोणाचे काय नुकसान करणार?”

https://www.instagram.com/p/CTHGBq5KEFx/?utm_source=ig_web_copy_link

ती पुढे लिहिते की, “तरीही जर तुमचं मन भरलं नसेल, तर खोटे खटले दाखल करत राहा… पाहा एक दिवस सर्वकाही समोर येईल… सत्य कधीतरी बाहेर येतंच. मोबाईलमध्ये माझ्याकडे सर्व काही आहे, पण तुम्ही लोकांनी सर्वकाही सील केले आहे… आज माझी वेळ वाईट आहे, उद्या तुमच्यावर ही वेळ येईल. तुम्हाला जे करायचे आहे ते करा, मी हार मानणार नाही.”

दरम्यान, गहनाला मुंबई पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये एक पॉर्न फिल्म बनवल्याप्रकरणी अटक केली होती. ती सध्या जामिनावर बाहेर आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर तिने पाॅर्न व्हिडिओ बनवल्याचे दिसले.

गहनाने ‘गंधी बात’ या वेब सीरिजमध्ये अभिनेत्री म्हणून काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

हे देखील वाचा