Friday, July 25, 2025
Home बॉलीवूड ऐकावे ते नवलच! लॉस एंजेलिसमध्ये स्वरा भास्करचे सामान घेऊन पळाला कॅब ड्रायव्हर, नेटकाऱ्यानी उडवली खिल्ली

ऐकावे ते नवलच! लॉस एंजेलिसमध्ये स्वरा भास्करचे सामान घेऊन पळाला कॅब ड्रायव्हर, नेटकाऱ्यानी उडवली खिल्ली

चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकणारी स्वरा भास्कर खऱ्या आयुष्यातही तिच्या बोल्ड वक्तव्यासाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. आपल्या हटके स्टाईलमुळे चर्चेत राहणारी स्वरा भास्कर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. स्वरा नेहमीच चर्चेचा विषय बनत असते अभिनेत्री सध्या लॉस एंजेलिसमध्ये आहे. यादरम्यान स्वरा भास्करसोबत एक विचित्र प्रकार घडला ज्याबद्दल तिने सोशल मीडियावर सांगितले. कॅब ड्रायव्हर सर्व सामान घेऊन कसा पळून गेल्याचे स्वराने सांगितले. या विचित्र प्रकरणाबाबत वाचून चाहतेही बिनधास्त प्रतिक्रिया देत आहेत. एका युजर तर स्वराला म्हणाला की, ती काश्मीर फाइल्सच्या प्रदर्शनाच्या भीतीने अमेरिकेत पळून गेली आहे. तर दुसरीकडे काही युजर्सनी स्वरा भास्करची खिल्लीही उडवली.

काय आहे प्रकरण? 

स्वरा भास्करने २४ मार्च रोजी ट्विटरवर ट्वीट केले आणि सांगितले की, “लॉस एंजेलिसमधील एक कॅब ड्रायव्हर माझे रेशन आणि खाद्यपदार्थ घेऊन पळून गेला आहे. तुमच्या कॅब ॲपवर ही तक्रार नोंदवण्याचा कोणताही मार्ग नाही. माझे सामान हरवले नाही, पण तो ड्रायव्हर माझे सामान घेऊन गेला आहे. कृपया मला माझे सामान परत मिळेल का?”

स्वरा भास्करच्या या पोस्टवर काही युजर्सनी तिची खिल्ली उडवली. एका युजरने स्वराचा जुना बसण्याचा व्हिडिओ पोस्ट केला असून, अभिनेत्रीचे रेशन चोरीला गेले आहे, त्यामुळे ती बसली आहे. तर त्याचवेळी काही युजर्सनी सांगितले की, त्यांनी चोराचे हास्यास्पद ट्वीट देखील केले. ज्याचा या पोस्टशी काहीही संबंध नाही.

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर स्वरा भास्कर शबाना आझमी आणि दिव्या दत्ता यांच्यासोबत शीर ‘कोरमा’ या शॉर्ट फिल्ममध्ये दिसणार आहे. आतापर्यंत अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. याशिवाय ती ‘जहां चार यार’ या चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा