कॅनेडियन अभिनेता सेंट वॉन कोलुसी याचे वयाच्या २२ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. कोलुसी याने प्रसिद्ध BTS गायक जिमिनसारखे दिसण्यासाठी त्याने अनेक कॉस्मॅटिक सर्जरी केल्या होत्या. त्याने तब्बल स्वतःवर १२ सर्जरी करून घेतल्या होत्या. या सर्जरीचा दुष्परिणाम त्याच्या झाला आणि त्याची प्रकृती खालावली. त्यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले गेले, मात्र यातच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याने स्वतःवर जबड्यापासून, नाक, आयब्रो, ओठ आणि चेहऱ्यावर सर्जरी केली होती.
सांगितले जात आहे की, सेंट वॉन कोलुसीने सर्जरी केल्यानंतर काही महिन्यांनी त्याला त्याचा त्रास जाणवू लागला आणि त्याचे दुष्परिणाम दिसू लागले. यामुळे त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर त्याने त्याचा जबडा काढण्याचा निर्णय घेतला. यासाठी तो रुग्णालयात भरती झाला होता. त्याच्यावर सर्जरी झाली आणि २३ एप्रिल रोजी त्याचा मृत्यू झाला. सांगितले जात आहे की, सेंट वॉन कोलुसीच्या शरीरात संपूर्ण इन्फेक्शन झाले होते. त्याने त्याच्या या सर्व शास्त्रक्रियांवर तब्बल १ कोटी ८० लाखांपेक्षा अधिक खर्च केला होता.
सेंट वॉन कोलुसीच्या कामाबद्दल सांगायचे झाल्यास तो २०१९ साली दक्षिण कोरियामध्ये आला होता. त्याने अनेक ड्रामा सिरीजमध्ये काम केले होते. सेंट वॉन कोलुसीने मागच्या वर्षी जूनमध्ये कोरियन ड्रामा ‘प्रिटी लाइज’ची शूटिंग सुरु केली होती आणि डिसेंबरमध्ये ती संपली होती.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
“दगडाची किंमत वाढवत आहे” घटस्फोटानंतर आयुष्यात पुढे जाणाऱ्या ‘या’ मराठी अभिनेत्री पोस्ट झाली व्हायरल
दमदार अंदाजमध्ये तलवारबाजी करताना दिसली सुश्मिता सेन, व्हिडिओ शेअर करत लिहिले…