प्रसिद्ध अभिनेते आणि चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांना मागील काही महिन्यांपूर्वी कॅन्सरचे निदान झाले होते. अलीकडेच त्यांनी कॅन्सरवर सर्जरी केल्यानंतर ते आता कॅन्सरमुक्त झाले आहेत. मुंबई येथील एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयामध्ये मांजरेकरांवर ही सर्जरी झाली होती. यानंतर काही दिवस ते रुग्णालयामध्ये ऍडमिट देखील झाले होते. याबाबत खुद्द महेश मांजरेकर यांनी आपल्या ‘अंतिम’ चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शनादरम्यान सांगितले.
त्यांनी सांगितले की, “मी जवळ जवळ ३५ किलो वजन कमी केले आहे. ‘अंतिम’ चित्रपटादरम्यान मला कळले की, मला कॅन्सर आहे. तसेच ‘अंतिम’ चित्रपटाच्या शेवटच्या भागाची शूटिंग मी तेव्हा केली, जेव्हा मला कॅन्सर होता आणि मी कीमो थेरेपीचा उपचार घेत होतो. आता मला तुम्हांला सांगायला आनंद वाटतो की, आज मी कॅन्सर मुक्त झालो आहे.”
यादरम्यान त्यांनी सांगितले की, “मला कॅन्सर असल्याचे समजल्याने मला काय झटका वगैरे आला नाही. तो आजार मी स्वीकारला. असे अजून खूप लोक आहेत की, ज्यांना कॅन्सर आहे, ते त्या आजाराशी अजूनही लढत आहेत. मात्र, ते लढतात आणि नंतर पुन्हा जीवन जगतात. यामुळे मी खूप काय त्रासलो नाही. माझी टीम माझी काळजी घेत होती. तसेच सलमान आणि आयुष्य यांनी मला यावेळी खूप मदत केली.”
“मी जे चित्रपट दिग्दर्शित करतो त्या चित्रपटात मला काम करायला आवडत नाही. कारण तुम्ही स्वत:ला पाहू शकत नाही. आपण बोलू देखील शकत नाही की, आपला शॉट चांगलाच आला. यामध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका चांगली होती. म्हणून मी ती केली. तसेच मी सलमान खानला खूप वर्षांपासून ओळखतो. आम्ही दोघे भावासारखे आहोत आणि आम्ही दोघांनी सोबत खूप चित्रपट केले आहेत. सलमानला डायरेक्ट कारण काही अवघड नव्हते. कारण मला त्याच्याकडून काय घ्यायचे आहे, ते मला माहिती होते,” असेही मांजरेकर पुढे बोलताना म्हणाले.
मांजरेकरांनी ११९२ मध्ये आलेला मराठी चित्रपट ‘जीवा सखा’मधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. मराठीशिवाय त्यांनी हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे. त्यात ‘कांटे’, ‘वाँटेड’, ‘मुसाफिर’, ‘प्लॅन’, ‘जिंदा’, ‘दस कहानियां’, ‘रेडी’ आणि ‘दबंग यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. अलीकडेच महेश हे डिझनी प्लस हॉटस्टारवरील सीरिज ‘1962ः द वॉर इन द हिल’ मध्ये दिसले होते.
महेश हे अभिनेत्यासोबतच एक दिग्दर्शकही आहेत. त्यांनी ‘आई’, ‘वास्तव’, ‘निदान’ आणि ‘विरुद्ध’ सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शित केले आहेत. त्यांच्यातील खास गोष्ट ही आहे की, ते एक अभिनेता, चित्रपट निर्माते सोबतच चांगले डान्सर देखील आहेत. ते ‘झलक दिखला जा’ या शोचे २००६ साली दुसरे रनरअप राहिले आहेत. यासोबत ते ‘बिग बॉस मराठी’ शो होस्ट देखील करतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भर इव्हेंटमध्ये उघडली सोनम कपूरच्या शर्टची बटणं, कॅमेऱ्यात कैद झाला अभिनेत्रीचा ‘Oops Moment’
-आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज होणार सुनावणी, बेल मिळेल की पुन्हा कोठडी?
-भ्रष्टाचारांच्या आरोपांमध्ये दिल्लीला पोहचले वानखेडे; ‘कामानिमित्त आलो आहे’, म्हणत दिले स्पष्टीकरण










