प्रसिद्ध कॉमेडियन लिली सिंग (Lily Singh) आपल्या विनोदी अभिनयाने आणि कॉमेडिने सगळ्यांची मने जिंकत असते. तिचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत जे तिच्या कॉमेडी कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहताना दिसत असतात. मात्र आता तिच्या चाहत्यांची चिंता वाढली आहे. कारण त्यांची लाडकी कॉमेडियन लिली सिंग सध्या रुग्णालयात असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. याची माहिती स्वतः लिलीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे.
कॉमेडियन लिली सिंग तिच्या युट्यूब चॅनेलवरून आपल्या चाहत्यांंसाठी अनेक नवनवीन व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या चाहत्यांना तिचे हे व्हिडिओ खूपच तिच्या चाहत्यांना खूपच आवडत असतात. मात्र सध्या तिच्या चाहत्यांना तिच्या एका बातमीने जोरदार धक्का बसला आहे. लिलीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने ती दवाखाण्यात उपचार घेत असल्याचे सांगितले आहे.
हा व्हिडिओ शेअर करत तिने सांगितले आहे की, “आजचा दिवस मी इआर मध्ये घालवला आहे. माझ्या दोन्ही ओवेरीमध्ये गाठ आहे. मला हे समजून घ्यायला हवं, हा रोग मला प्रत्येक महिन्याला त्रास देईल. त्याचबरोबर मला माझी मासिक पाळीसुद्धा त्रास देईल. मी खूप कमजोर झाली आहे. त्यामुळे मला माझ्या शरीराकडून अधिकाअधिक कष्ट करुन घ्यावे लागेल.” लिलीच्या या व्हायरल व्हिडिओने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
तिच्या या पोस्टवर तिचे चाहते जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. तिच्या प्रकृती अत्यवस्थेमुळे चिंतेत पडलेल्या तिच्या चाहत्यांनी तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्यास सुरूवात केली आहे. त्याचबरोबर अनेक सेलिब्रेटीसुद्धा यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. यावर होवी मंडलने प्रतिक्रिया देताना “जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची आवश्यकता असेल तर तुम्ही मला सांगू शकता” असे म्हटले आहे. तर अमांडा सेर्नीने यावर प्रतिक्रिया देताना “हे खूपच त्रासदायक आहे, तुम्हाला लवकर ठीक वाटेल अशी मी आशा करते” असे विधान केले आहे. तसेच जॅकलिननेसुद्धा लिलीच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
हेही वाचा –










