सुपसस्टार अजित कुमारचा ‘वालीमाई’ चित्रपट झाला प्रदर्शित, थिएटर बाहेर फुटला पेट्रोल बॉम्ब

0
18641
ajit kumar
Photo Courtesy : Screengrab: Youtube/

दाक्षिणात्य सुपरस्टार अजित कुमारचा बहुचर्चित ‘वलीमाई’ चित्रपट मोठ्या प्रतिक्षेनंतर शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटगृहात दाखल झाला आहे. या चित्रपटाची प्रेक्षक दीर्घकाळ वाट पाहत होते मात्र आता चित्रपटाच्या प्रदर्शनाने चाहते खुश झाले आहेत. परंतु या चित्रपटासाठी चित्रपटगृहाबाहेर जमलेल्या जमावावर अज्ञात व्यक्तींनी बॉंम्ब हल्ला केल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. यामध्ये एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वारंवार प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलाव्या लागलेला सुपरस्टार अजित कुमारचा बहुचर्चित वालीमाई चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र चित्रपट प्रदर्शित होताच एका चित्रपटगृहाबाहेर बॉंम्ब हल्ला झाल्याने सगळीकडे चर्चा रंंगली आहे. हा सगळा प्रकार गुरूवारी ( २४ फेब्रुवारी) कोयंबटूरमध्ये झाला आहे. यावेळी चित्रपटगृहाबाहेर जमलेल्या जमावावर मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी थेट हल्ला चढवत पेट्रोल बॉंम्ब फेकले. अचानक झालेल्या या हल्ल्याने सगळेच घाबरून गेले होते. या हल्ल्यात एक इसम जखमी झाला आहे. यावेळी काही लोक चित्रपटगृहाच्या बाहेर सुपरस्टार अजित कुमारचा फ्लेक्स लावत होते. याचवेळी हा हल्ला झाला आहे. यामध्ये नवीन कुमार नावाची व्यक्ती जखमी झाली आहे. मात्र दुसरी कोणतीही हानी न झाल्याने सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.मात्र या हल्ल्यामुळे इतर चित्रपटगृहांबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता अजित कुमार आणि हुमा कुरेशी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या संपूर्ण घटनेचा सध्या पोलिस तपास सुरू आहे.

या हल्ल्याची अधिक माहिती सांगताना पोलिस म्हणाले की, यामध्ये नविनला छोटीशी जखम झाली आहे. ज्यामुळे तो सध्या तणावात आहे. हा प्रकार फ्लेक्स लावण्यावरुन घडला की काय याचा तपास पोलिस सध्या करत आहेत .या प्रकारामुळे इतर ठिकाणी काही अनुसूचित बाब घडू नये म्हणून पोलिसांनी इतर चित्रपटगृहाबाहेर कडक बंदोबस्त ठेवला आहे. एच. विनोद यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाबद्दल माहिती सांगताना ते म्हणाले की, चित्रपटाला फक्त एक्शन सीन आहेत म्हणून न बघता कथा सुद्धा बघावी कारण चित्रपटात अजित कुमारच्या अभिनयाची सुंदर झलक त्यात पाहायला मिळते. चित्रपटात हुमा कुरेशीने सुद्धा दमदार अभिनय केला आहे. अभिनेता अजित कुमारने चित्रपटात प्रामणिक पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. या पोलिसाच्या भूमिकेत अजितने कार आणि गाड्यावर मोठे स्टंट केलेले दिसत आहेत. ”

दरम्यान या चित्रपटाची अनेक दिवसापासून सोशल मीडियाात जोरदार चर्चा सुरू होती. कोरोमामुळे चित्रपट प्रदर्शित व्हायलाही वेळ लागला ज्यामुळे चाहत्यांना बरीच वाट पाहावी लागली होती . आता चित्रपट प्रदर्शित झाल्याने प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत.

हेही वाचा – 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here