Thursday, April 24, 2025
Home बॉलीवूड जीवापेक्षा या कलाकारांना स्माईल आणि आवाज झालाय जास्त प्रिय, चक्क उतरवल्यात पॉलीसी

जीवापेक्षा या कलाकारांना स्माईल आणि आवाज झालाय जास्त प्रिय, चक्क उतरवल्यात पॉलीसी

मित्रांनो, अभिनय क्षेत्रच असं आहे की, ज्यात तुम्ही कसे दिसता. तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे. तुमचा लूक कसा आहे. तुमचा आवाज यावर बऱ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे ऍक्टर या गोष्टींकडे सर्वात जास्त लक्षही देतात आणि मेहनतही घेतात. पण जर असं सांगितलं तर की काही ऍक्टर्स असेही आहेत त्यांनी चक्क त्यांच्या आवाजासाठी, हस्यासाठी विमा पॉलिसी काढली आहे, तर तुम्ही म्हणाल काहीही काय. पण मंडळी हे खरंच. असे विचित्र विमा पॉलिसी काढणारे ऍक्टर्स आहेत बरं का तेही भारतात देखील.

स्माईलपासून आवाजापर्यंत विचित्र इंश्यूरन्स काढणारे सेलिब्रेटी

‘देसी गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी प्रियांका चोप्रा (priyanka chopra)तिच्या अभिनयामुळे नेहमीच गाजत असते… पण तिची स्माईल सर्वात मोलाची आहे बरं का. आता तुम्ही म्हणाल हे काय नवीन, तर अनेक मिडीया रिपोर्ट्सनुसार प्रियांकाने तिच्या पाऊटी स्माईलचे कॉपीराईट घेऊन ठेवलेत, म्हणजे तर सर्जरी वैगरी करून कोणी तिच्यासारखी स्माईल मिळवण्याचा प्रयत्न केला, तर त्या व्यक्तीला मोठी रक्कमेचा भूरदंड पडेल.

बीग बी अर्थात अमिताभ बच्चन, (amitabh bachchan)  नाव ऐकून तुम्ही शॉक झाला ना की बीग बींचे नाव या यादीत कसं. तर त्यांनीही त्यांच्या आवाजाचा कॉपीराईट करून घेतल्याचं म्हटलं जातं. खरंतर त्यांचा आवाज वाईट गोष्टींच्या प्रचारासाठीही वापरला जातोय हे लक्षात आल्यानंतर त्यांना आपल्या आवाजाचे महत्त्व कळाले. अमिताभ यांच्या आवाजाने त्यांच्या भूमिकेला चार चांद लागतात आणि त्यांचा आवाज भारतभरात ओळखीचाही आहे, पण त्यांचा आवाज आता कोणी चोरू शकत नाही…

केवळ बीग बीच नाही, तर लता मंगेशकर (lata mangeshkar) आणि रजनीकांत (rajnikanth) यांनी देखील आपल्या आवाजाच्या पॉलिसी काढून ठेवल्या होत्या. गानकोकिळा लता मंगेशकर यांचा आवजच त्यांच्यासाठी त्यांचे वैभव होते, त्यामुळे त्यांनीही त्यांच्या आवाजाची पॉलिसी काढून ठेवली होती. तसेच रिपोर्ट्सनुसार असे म्हटले जाते की, १९६० मध्ये त्यांच्या वॉकल कॉर्ड्सला समस्या झाली होती, ज्यानंतर त्यांनी त्यांच्या आवाजाची पॉलिसी करण्याचा निर्णय घेतलेला. तर साऊथ सुपरस्टार रजनीकांतचे चाहतावर्ग मोठा आहे, त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत, पण त्यांनीही त्यांच्या आवाजाची पॉलिसी काढली आहे.

याशिवाय नेहा धुपिया, मल्लीका शेरावत, मनिषा लांबा, राखी सावंत यांनीही त्याच्या शरिराच्या काही भागांची पॉलिसी काढून ठेवली असल्याचे म्हटले जाते. अशा विचित्र पॉलिसीसाठी जॉन अब्रहमचेही नाव येते बरं का. धूम फेम जॉन अब्रहम हँडसम हिरोंपैकी एक मानला जातो, त्याच्या बॉडीचे अनेक दिवाने आहेत. त्याचमुळे अनेर विमा कंपनींनी त्याला त्याच्या विविध अंगांची पॉलिसी करण्यासाठी संपर्क केल्याचे अनेक रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते. पण अद्याप त्याने असे काही विमा उतरवले आहेत की नाही, याबद्दल माहिती उपलब्ध नाही.

महत्त्वाचे म्हणजे कलाकारच नाही, तर क्रिडा क्षेत्रातील दिग्गजांनीही अशा विमा पॉलिसी काढल्या आहेत. सानिया मिर्झाने तिच्या हाताचा, विजेंदर सिंगने त्याच्या बोटांची पॉलिसी काढून ठेवली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा