Thursday, April 18, 2024

बाबो | बंगाल इंडस्ट्रीमध्ये १५ दिवसांतच ४ अभिनेत्रींची आत्महत्या, हदरली सिनेसृष्टी

शारिरीक वेदना जेवढ्या असह्य असतात, तेवढ्याच मनाला होणाऱ्या वेदनाही त्रासदायक ठरतात, इतक्या की एखाद्याला आपली जीवही नकोसा होता. म्हणूनच मानसिक आरोग्यही महत्त्वाचे असते, हेच पुन्हा एकदा समोर आले, ते बंगाली इंडस्ट्रीत लागोपाठ झालेल्या आत्महत्येच्या सत्रामुळे. केवळ १५ दिवसांत बंगालमधील ४ अभिनेत्रींनी आपले जीवन संपवण्याच्या घटना समोर आल्या आणि अभियन क्षेत्राला मोठा धक्का बसला. कोण होत्या त्या अभिनेत्री नक्की काय झालं होतं त्यांच्याबरोबर हे आपण या व्हिडिओतून थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

बंगालमधील आत्महत्याच्या सत्राला सुरुवात झाली ती पल्लवी डेपासून (pallavi dey). १५ मे रोजी पल्लवीने तिच्या अपार्टमेंटमध्ये फॅनच्या मदतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले होते. पण तिच्या पालकांनी तिचा लिव्ह इन पार्टनर साग्निक चक्रवर्ती याच्यावर हत्येचा आरोप लावला, ज्यामुळे त्याला अटकही करण्यात आली. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार तिच्या नातेवाईकांनी केलेल्या आरोपांमध्ये म्हटलं होते की, साग्निकचे आधीच लग्न झाले होते आणि हे जेव्हा तिला समजले, तेव्हा तिने त्याच्याकडे याबद्दल विचारणाही केलेली. पण त्याने डिवोर्सची प्रक्रिया चालू असल्याचे कारण सांगितले. महत्त्वाची गोष्ट अशी की साग्निक यानेच तिच्या आत्महत्येबद्दल पोलिसांना कळवले होते, त्याचबरोबर तिच्या आत्महत्येपूर्वी त्याचे तिच्याशी भांडण झाल्याचेही कबुल केलेलं. तरी अद्याप या प्रकरणात आणखी काही माहिती समोर आलेली नाही.

धक्कादायक गोष्ट अशी की पल्लवी हिच्या मृत्यूबद्दल अभिनेत्री बिदीशा डे मुजुमदार हिनेही शोक व्यक्त केला होता आणि त्याच बिदीशाने १० दिवसांनंतर स्वत:चेच जीवन संपवल्याचे समोर आले. तिनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली. २५ मे रोजी तिने केवळ २१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तिच्या मृत्यूला विविध फाटे फुटलेत. ज्यादिवशी तिचे निधन झाले, त्याचदिवशी तिने एका मॉडेलबरोबर फोटो शेअर केला होता. ज्यात तिने लव्ह यू बौ लिहिले होते. बौ म्हणजेच पत्नी. दरम्यान असेही समोर आले की, ज्या मॉडेलबरोबर तिने फोटो शेअर केला होता, तिला ती पत्नी असल्याचा दावा करायची. इतकंच नाही तर, माध्यमांतील वृत्तानुसार बिदीशा तिच्या बॉयफ्रेंडमुळे त्रासात असल्याचेही म्हटले गेले. त्याचे इतर मुलींबरोबरही संबंध होते, ज्यामुळे ती डिप्रेशनमध्ये होती….पोलिसांना जेव्हा ती लटकलेल्या अवस्थेत सापडली, त्यावेळी सुसाईड नोटही सापडली. काही रिपोर्ट्सनुसार तिच्या सुसाईड नोटमध्ये तिने कॅन्सर असल्याचे सांगितले, तर काही रिपोर्ट्सनुसार तिला करियरमध्ये मिळणाऱ्या कमी संधीमुळे तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले गेले. पण अद्याप ठोस कारण काही समोर आलेले नाही.

आपल्या जवळची व्यक्ती जाण्याचे दु:खही असह्य असते असेच काहीसे दिसून आले ते अभिनेत्री मंजुषा नियोगी हिच्या मृत्यूतून. बिदीशाच्या मृत्यूनंतर दोनच दिवसात तिची मैत्रीण आणि अभिनेत्री मंजुषा नियोगी हिनेही आपले जीवन संपवण्याची घटना समोर आलेली. माध्यमांतील वृत्तानुसार तिच्या आईने माहिती दिलेली की, मंजुषा बिदीशाच्या जाण्याने खूप निराश होती. ती कायमच तिच्याबद्दल बोलायची… तिने तिच्या आईला असेही सांगितले होते की, बिदीशाप्रमाणेच लवकरच आपल्या घरावरही मीडिया फोकस करेल…. तिने काही मालिकांमध्येही काम केले होते…. २७ मे रोजी बराचवेळ ती तिच्या खोलीतून बाहेर न आल्याने तिच्या पालकांनी तिला फोन केला. पण त्याला काहीच उत्तर मिळाले नाही. त्यानंतर त्यांनी तिच्या खोलीत जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले. तरी अद्याप तिच्या मृत्यूचे स्पष्ट कारण समोर आलेले नाही.

या तीन अभिनेत्रींच्या शोकातून बाहेर येत असतानाच बंगाल इंडस्ट्रीला धक्का बसला तो १८ वर्षीय सरस्वती दास हिच्या मृत्यूने. २९ मे रोजी तिने गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघड झाले. ती प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट आणि मॉडेल होती. तिने गळफास घेतल्याचे तिच्या आजीच्या लक्षात आल्याने त्यांनी तिला लगेचच उपचारासाठी हलवले होते, पण तिने आपला जीव सोडला होता. तसेच रिपोर्ट्सनुसार तिचे तिच्या बॉयफ्रेंडबरोबर भांडण झाले होते.

जाणारा जातो, पण मागे अनेक प्रश्न ठेवून जातो, असंच काहीसं झालंय या चार मॉडेल्सबद्दल. त्यांच्या मृत्यूनंतर मानसिक आरोग्यापासून ते रहस्यमयी मृत्यूंपर्यंत अनेक प्रश्न उभे राहिलेत, तुम्हाला या घटनाबद्दल काय वाटतं, हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दैनिक बोंबाबोंबच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करण्यास विसरू नका.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा