Friday, April 19, 2024

घरच्यांच्या विरोधाला न जुमानता धर्म बदलून संसार थाटणारे कलाकार, १३ जणांच्या नावाने यादी फुल्ल

एखादी व्यक्ती आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टींसाठी काहीही करायला तयार असते. मग त्यासाठी वाट्टेल ते कष्ट तो घेतो. सिनेसृष्टीतील कलाकारांचंही असंचंय बघा, पण त्यांना हव्या असणाऱ्या गोष्टींसाठी त्यांनी लईच मोठा निर्णय घेतलाय. हे ऐकूण तुम्हीही म्हणाल की, या कलाकारांनी असं काय केलंय बरं, तर काही बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या करिअरसाठी आणि लग्नासाठी थेट त्यांचा धर्मच बदललाय. होय, तुम्ही बरोबर ऐकलंत. काही बॉलिवूड कलाकारांनी आपला धर्म बदललाय.

कॅटरिना कैफ
यादीत पहिल्याच क्रमांकावर नाव येतंय ते ‘कॅट’ म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) हिचं. कॅटरिनाचा जन्म तसा ख्रिश्चन कुटुंबातील, पण अभिनेत्रीने बॉलिवूडचा धडाकेबाज अभिनेता विकी कौशलसोबत संसार थाटण्यासाठी थेट हिंदू धर्म स्वीकारला. तसं विकीच्या घरचे या लग्नासाठी तयार नव्हते. पण तरीही कॅटरिना अन् विकीने लग्न केले. लग्नासाठीच कॅटरिनानं आपला धर्म बदलला.

ए. आर. रहमान
म्युझिक इंडस्ट्रीतील प्रसिद्ध संगीतकार आणि गायक ए. आर. रहमानबद्दल अनेकांना माहिती नाही की, त्याचा जन्म हिंदू कुटुंबात झाला होता. त्याचं पहिलं नाव दिलीप कुमार होतं. हे नाव त्याच्या आई-वडिलांनी ठेवलं होतं. पण नंतर त्याच्या इस्लाम धर्मावर विश्वास असल्याने त्याने इस्लाम धर्म स्वीकारला. इस्लाम धर्मात आल्यानंतर त्यानं आपलं नाव बदलत अल्लारखा रहमान असं ठेवलं.

अमृता सिंग
तिसऱ्या क्रमांकावर आहे प्रसिद्ध अभिनेत्री अमृता सिंग. अमृताचा जन्म शीख कुटुंबात झाला होता. पण पुढे तिने इस्लाम धर्म स्वीकारला. जेणेकरून तिला अभिनेता सैफ अली खानशी लग्न करता येईल. तसं सैफचे आई-वडील या लग्नाच्या विरोधात होते. पण तरीही त्यांनी लग्न केले. त्यानंतर तब्बल १३ वर्षांनंतर ते वेगळे झाले. घटस्फोटानंतर अमृताने पुन्हा शीख धर्म स्वीकारलाय. दुसरीकडे सैफ करीना कपूरसोबत लग्न करून सुखी आयुष्य जगतोय.

धर्मेंद्र
बॉलिवूडचे ‘ही मॅन’ धर्मेंद्र यांचाही या यादीत समावेशंय. धर्मेंद्र यांना ‘ड्रीम गर्ल’ हेमा मालिनी यांच्याशी लग्न करायचं होतं. पण त्यांच्या पहिल्या पत्नीनं त्यांना घटस्पोट देण्यास नकार दिला. असं असलं, तरीही धर्मेंद्र यांनी हेमा मालिनींशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्माचा स्वीकार केला. धर्म बदलल्यानंतर त्यांनी आपलं नाव दिलावर खान केवल असं ठेवलं.

शर्मिला टागोर
या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे बॉलिवूडची सदाबहार अभिनेत्री शर्मिला टागोर. शर्मिलांनी मन्सूर अली खान पतौडी यांच्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता. धर्म बदलल्यानंतर त्यांनी आपलं नाव बदलून बेगम आयेशा सुल्ताना ठेवलं.

हेमा मालिनी
‘ड्रीम गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री हेमा मालिनी यांचाही यामध्ये समावेशंय. त्यांनीही आपला धर्म बदलत इस्लामचा स्वीकार केला. जेणेकरून त्यांना धर्मेंद्र यांच्याशी लग्न करता येईल. त्यानंतर त्यांनी आपलं नावही बदललं. त्यांचं नाव त्यांनी आयशा बी आर चक्रवर्ती असं ठेवलं.

हेजल कीच
‘बॉडीगार्ड’ सिनेमा आठवतोय का बरं? हो तोच तो त्यात सलमान खान आणि करीना कपूरने मुख्य कलाकारांचा रोल साकारलाय. याच चित्रपटात एक अभिनेत्री होती, जिने करीनाच्या मैत्रिणीचा रोल साकारला होता. ती म्हणजेच हेजल कीच. हेजलचा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला होता. हेजलने माजी भारतीय क्रिकेटर युवराज सिंगसोबत लग्न करण्यासाठी धर्म बदलत शीख धर्म स्वीकारला. त्यानंतर तिचं नाव बदलून गुरबसंत कौर ठेवण्यात आलं.

आयेशा टाकिया
आठव्या क्रमांकावर आहे सलमान खानच्या ‘वाँटेड’मधली आयेशा टाकिया. आयेशाने आपला धर्म बदलत इस्लाम धर्माचा स्वीकार केला, आणि आपला बॉयफ्रेंड फरहान आझमीसोबत संसार थाटला.

दिव्या भारती
एका वर्षात अनेक हिट सिनेमे देणाऱ्या दिव्या भारतीचा जन्म हा हिंदू कुटुंबात झाला होता. ती खूपच धार्मिक होती. दररोज मंदिरातही जायची. पण तिला साजिद नाडियाडवाला यांच्याशी प्रेम झालं आणि त्यांच्याशी लग्न करण्यासाठीच तिने इस्लाम धर्म स्वीकारला. इस्लाम धर्माचा स्वीकार केल्यानंतर तिनं आपलं नाव सना ठेवलं.

नगमा
यादीतील दहावं नाव म्हणजे नगमा. नगमाचा जन्म हिंदू कुटुंबात झालेला. पण पुढे ख्रिश्चन धर्मावरील तिचा विश्वास वाढला आणि तिने धर्म बदलला.

ममता कुलकर्णी
अभिनेत्री ममता कुलकर्णीचा जन्म हा हिंदू कुटुंबातील. पण तिने बॉयफ्रेंड विकी गोस्वामीसोबत लग्न करण्यासाठी आपला धर्म बदलत इस्लाम धर्माचा स्वीकार केला. विकी यूएईच्या तुरुंगात होता. पण इस्लाम धर्माचा स्वीकार करताच त्याची शिक्षा कमी झाली. त्यामुळेच ममतानेही विकीशी लग्न करण्यासाठी धर्म बदलला.

महेश भट्ट
बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांना सोनी राजदान यांच्याशी प्रेम झालं, जी आलिया भट्टची आई आहे. पण महेश यांच्या पहिल्या पत्नीने घटस्फोट देण्यास नाकारल्यामुळे महेश यांनी सोनी राजदान यांच्याशी लग्न करण्यासाठी इस्लाम धर्म स्वीकारला.

नयनतारा
दाक्षिणात्य अभिनेत्री नयनताराचा जन्म ख्रिश्चन कुटुंबात झाला होता, पण नंतर तिने हिंदू धर्माचा स्वीकार केला. तिचं प्रभू देवावर प्रेम होतं आणि त्याच्याशी लग्न करण्यासाठीच तिने धर्म बदलल्याचे म्हटले जाते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

तब्बल ४० लाखांची कार, ५० लाखांचा डायमंड नेक्लेस, वाचा अंकिताला गिफ्टमध्ये काय काय मिळालेलं

चाहत्यांच्या काळजाला चटका लावून कलाकारांनी घेतली एक्झिट! ‘या’ दिग्गजांच्या निधनाने हादरली सिनेसृष्टी

साताजन्माच्या गाठी! तिकडं काहीही होऊद्या, पण २०२१मध्ये लग्न थाटून मजेत आहेत ‘हे’ कलाकार

हे देखील वाचा