बिनसलं तर नाही ना…! आमिर ते रजनीकांत, ‘या’ सेलिब्रिटींनी ‘द कपिल शर्मा शो’कडे फिरवली पाठ


विनोदाच्या दुनियेत नावारुपाला आलेला विनोदी कलाकार म्हणजे कपिल शर्मा. कपिलने आपल्या ‘द कपिल शर्मा शो’मधून प्रेक्षकांना खदखदून हसवले आहे. त्याच्या शोमध्ये फक्त बॉलिवूडच नाही, तर हॉलिवूडचे देखील अनेक कलाकार येऊन गेले आहेत. जसे की, ‘महानायक’ अमिताभ बच्चन, सलमान खान, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांसारखे अनेक कलाकार होय. परंतु अजूनही काही सेलिब्रिटी असे आहेत, जे या शोमध्ये सहभागी झालेले नाहीत. यामध्ये मराठी आणि हिंदी दोन्ही इंडस्ट्रीमधील कलाकारांचा समावेश आहे.

या शोमध्ये फक्त सिनेसृष्टीतीलच नाही, तर इतर क्षेत्रातील दिग्गज मंडळींनीही हजेरी लावली आहे. मात्र, नाना पाटेकर, सचिन तेंडुलकर, एमएस धोनी यांसारख्या अनेक मोठ्या कलाकारांना शोमध्ये आणणे शक्य झाले नाही. या शोमध्ये येण्यासाठी अनेकांनी नकार दर्शवला आहे. ज्या कलाकारांनी यासाठी नकार दिला आहे, त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

सचिन तेंडुलकर
सचिन तेंडुलकरचा ‘सचिन: अ बिलियन ड्रीम्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कपिलने सचिनला आपल्या शोमध्ये आमंत्रित केले होते. परंतु काही कारणास्तव सचिनने उपस्थित राहण्यास नकार दिला होता. त्यामुळे सचिन अजून एकदाही ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दिसलेला नाही.

मुकेश खन्ना
‘द कपिल शर्मा शो’ हा एक फालतू शो असल्याचे मुकेश खन्ना म्हणाले होते. पुरुषांना महिलांचे कपडे घालून चुकीच्या गोष्टी करायला सांगणे हे अश्लील आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. कपिलचा शो मूर्खांचा असल्याचे सांगत त्यांनी या शोमध्ये जाण्यास नकार दिला होता.

रजनीकांत
माध्यमातील वृत्तांनुसार, कपिलने सुपरस्टार रजनीकांत यांनादेखील आपल्या शोमध्ये आमंत्रित केले होते. मात्र, ते रियॅलिटी शोमधील चित्रपटांच्या प्रमोशनवर विश्वास ठेवत नाहीत, असे म्हणत त्यांनी आमंत्रण नाकारल्याची माहिती समोर आली होती.

आमिर खान
बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेले तीन खानपैकी कपिलच्या शोमध्ये सलमान खान आणि शाहरूख खान आले होते. मात्र, आमिर खान कधीच कपिलच्या शोमध्ये पाहायला मिळाला नाही.

तसे पाहायला गेले, तर आमिर खान कोणत्याही शोमध्ये जाऊन चित्रपटाचे प्रमोशन करताना फारसा दिसलेला नाही.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!