Wednesday, July 3, 2024

फक्त सलमान, संजय दत्तच नाही, तर ‘या’ सेलिब्रेटींनाही जावं लागलेलं जेलमध्ये

बॉलिवूड सेलिब्रेटी कशामुळे चर्चेत येतील काही सांगता येत नाही. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे, कधी काहीतरी वेगळ्या सोशल मीडिया पोस्टमुळे, कधीतरी पब्लिकमध्ये केलेल्या एखाद्या स्टंटमुळेही. हे कलाकार कधी काय करतील खरंच सांगता येत नाही. अनेकदा तर त्यांना त्यांच्या कृत्यामुळं जेलचीही हवा खावी लागलीय. हे अगदी खरंय काही असेही स्टार्स आहेत बरं का ज्यांनी चक्क जेलची हवा खाल्लीये. बरं यात काही छोटी नावं नाही, अगदी मोठ्या कलाकारांची नावं आहेत.  आपण त्या कलाकारांवर जरा नजर टाकू. 

या यादीतलं पहिलं नाव म्हणजे संजय दत्त. बॉलिवूडमधलं मोठं नाव असलेला हा ऍक्टर १९९३ मुंबई बॉम्बब्लास्टच्या प्रकरणात अडकला होता त्यासाठी त्याला ६ वर्षे तुरुंगवासाची शिक्षाही झालेली. पण २०१३ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्याची शिक्षा कमी करून ५ वर्षे केली होती. तो चांगल्या वागणूकीमुळे फेब्रुवारी २०१६ मध्ये जेलमधून बाहेर आला होता.

शिनी आहुजा देखील या यादीत आहे. त्याच्यावर बलात्काराचा आरोप झाला होता. त्यासाठी त्याला ७ वर्षांची शिक्षा झालेली. लाईफ इन अ मेट्रो, वेलकम बॅक, वोह लम्हे आशा चित्रपटामध्ये त्याने काम केलेलं. सैफ अली खान हा देखील जेलमध्ये जाणाऱ्या स्टार्समध्ये आहे बरं का. त्याला अटक झालेली कारण त्याने मुंबईतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एका बिझनेसमनला जोरदार ठोसा लगावलेला.

गेल्या काही वर्षात सर्वाधिक चर्चेत आलेली केस म्हणजे सुशांत सिंग राजपूत मृत्यू. या प्रकरणाला अनेक वळणं मिळत गेली. अजूनही त्यावर चर्चा होत असते. पण याच प्रकरणात रिया चक्रवर्तीला अटक झालेली. ती सुशांतची कथित गर्लफ्रेंडही होती. या यादीतील आणखी एक मोठं नाव म्हणजे सलमान खान. त्याला १९९८ साली काळवीट शिकार प्रकरणामुळे अटक झालेली. याच प्रकरणात सैफ अली खान, तब्बू, सोनाली ब्रेंद्रे हे स्टार देखील अडकले होते. इतकंच नाही, तर हिट अँड रन प्रकरणातही सलमान अडकलेला. धूम फेम जॉन अब्रमह यालाही रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात अटक झालेली. त्याला १५ दिवसांची शिक्षा सुनावली होती. पण नंतर ते बेलवर सुटला.

सुरज पंचोलीही या यादीत आहे. आदित्य पंचोलीचा मुलगा असलेल्या सुरजवर जिया खान आत्महत्या प्रकरणात अटक करण्यात आलेली. भूल भुलैय्या, चुपके चुपके, ढोल आशा चित्रपटांमधून ओळख मिळवलेला राजपाल यादवला देखील अटक झालेली. ५ कोटींच्या वसुलीच्या खटल्यात न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. तर इंदर कुमार याला २३ वर्षीय मॉडेलने बलात्काराचा आरोप केलेला. त्यामुळे त्याला अटक करण्यात आलेली. तर मंडळी हे आहेत काही स्टार ज्यांना जेलमध्ये किमान एकदा तरी जाऊन यावं लागलेलं. तुम्हाला मनोरंजन क्षेत्रातील आणखी कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडेल, हे नक्की सांगा आणि दैनिक बोंबाबोंबला सबस्क्राईब करायला विसरू नका.

हे देखील वाचा