Thursday, June 1, 2023

डिंपल कपाडिया राज कपूर आणि नर्गिस यांची मुलगी? वाचा काय आहे किस्सा

बॉलिवूडमध्ये कोणत्या गोष्टींची चर्चा होईल काही सांगता येत नाही, नाही का? कधी कोणत्या गोष्टीबद्दल अफवा पसरतील, याचाही काही नेम नसतो. अनेकदा तर या अफवा एखाद्या जोडीच्या रिलेशनशीपबद्दलच असतात. तसं तर आजपर्यंत बॉलिवूडमधील जोड्यांच्या अनेक लव्हस्टोरी गाजल्या आहेत. अनेक असेही स्टार्स आहेत, ज्यांच्या अफेअरच्या चर्चा झाल्या पण रिअल लाईफमध्ये मात्र ते जीवनसाथी बनू शकले नाही. अगदी अमिताभ – रेखा पासून सलमान – ऐश्वर्यापर्यंत अनेक स्टार्सची यात नावं येतात. यात राज कपूर आणि नर्गिस यांचेही नाव येते बरं का. जेव्हाही बॉलिवूडमधील अफेअर्सच्या चर्चा होतील, त्या त्या वेळेला राज कपूर आणि नर्गिसबद्दलही बोललं जाईल हे नक्की, पण तुम्हाला माहित आहे का की या दोघांची मुलगी डिंपल कपाडिया आहे, अशी अफवाही एकदा पसरली होती. नक्की काय आहे तो किस्सा जाणून घेऊया. 

त्याचं झालं असं की 60 च्या दशकाच्या सुमारास राज कपूर आणि नर्गिस यांचे एकत्र भूमिका असलेले अनेक चित्रपट आले होते. हे चित्रपट चांगलेच हिटही ठरले होते. राज आणि नर्गिस ही जोडी लोकप्रियतेच्या शिखरावर होती. त्यांच्यातील पडद्यावरील केमिस्ट्री लोकांना आवडत होती. पण आवारा, श्री 420, चोरी चोरी अशा अनेक हिट चित्रपटांत एकत्र काम केलंय म्हटल्यावर त्यांच्या अफेअर असण्याच्या चर्चा होणार नाही असं कसं होईल ना. तसंच झालं. त्यांच्यात अफेअर असल्याच्या खूप चर्चा झाल्या. असंही म्हटलं जातं की जवळपास 8 वर्षे नर्गिसला डेट केल्यानंतर राज कपूर यांनी तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. त्यावेळी राज यांचं क्रिष्णा कपूर यांच्याशी लग्नही झालेलं होतं. पुढे नर्गिसने सुनिल दत्त यांच्याशी लग्न केलं आणि सुखाने संसार केला.

पण, मधल्या काळात एक मोठी अफवा पसरली आणि अनेकांना आश्चर्य वाटलं. झालं असं की 1973साली बॉबी हा चित्रपट आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कपूर करत होते आणि त्यांनी या चित्रपटातून त्यांचा मुलगा ऋषी कपूरला पुढे आणले. तसेच हा चित्रपट डिंपल कपाडियाचाही पदार्पणाचा चित्रपट होता. या चित्रपटाने ऋषी आणि डिंपल यांना मोठं स्टारडम मिळवून दिलं. चित्रपट प्रचंड गाजला. डिंपलने तर पहिल्याच चित्रपटातून लाखो लोकांची मनं जिंकली. मात्र, झालं असं की डिंपलचा या चित्रपटातील लूक काहीसा नर्गिस यांच्याशी मिळताजुळता होता. तसंच असंही सांगितलं जातं की, राज कपूर आणि नर्गिस यांची जशी भेट झाली होती, तशीच घटना बॉबी चित्रपटात ऋषी कपूर आणि डिंपल कपाडियाच्या बाबतीत दाखवण्यात आली होती.

त्यामुळे झालं असं की मोठ्या प्रमाणात चर्चा व्हायला लागली की डिंपल ही नर्सिग आणि राज कपूर यांच्या प्रेमाची निशाणी असून त्यांची मुलगी असल्यानेच राज कपूर यांनी तिला चित्रपटात संधी दिली. डिंपलने एका मुलाखतीत सांगितलं होतं की तिने तिच्याबद्दल एक विचित्र अफवा ऐकलेली की ती संजय दत्तची सावत्र बहिण आहे.

अन्नू कपूर यांनी सांगितल्याप्रमाणे या अफवेबद्दल नर्गिस यांनीही प्रतिक्रिया दिलेली. नर्सिग म्हणाल्या होत्या की, ही अफवा कशी पसरली माहित नाही. डिंपलचा बॉबीमधील लूक काहीसा आवारामधील माझ्या लूकसारखा होता. पण म्हणून लगेच निष्कर्षापर्यंत पोहचायचं नसतं. आणि असं होऊ नये, पण जर खरंच असं झालं असतं तर मी माझ्या मुलीला स्विकारलं असतं. डिंपल एक हुशार मुलगी आहे आणि तिने या सर्व गोष्टींना चांगलं हताळलं. माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी आणि माझ्या कुटुंबाने याकडे दुर्लक्ष केलं. माझ्या मुलीही या अफवांवर हसल्या. फक्त माझा मुलगा संजय थोडा नाराज होता. पण तोही यातून बाहेर झाला. पण मला या अशा गोष्टींना महत्त्व द्यायचे नाही. मला नैसर्गिक मृत्यू हवा आहे.

असं म्हटले जाते की या अफवांमुळे संजय दत्तला त्याचे मित्र टोमणे वैगरे मारायचे म्हणून तो या अफवेमुळे नाराज होता. पण नंतर ही केवळ अफवा असल्याचे सिद्ध झाले आणि या चर्चा थांबल्या. पुढे डिंपल यांनी काही वर्षांसाठी ब्रेक घेतला. कारण बॉबी चित्रपट येण्याच्या काही दिवसांपूर्वीच राजेश खन्नाबरोबर त्यांनी लग्न गाठ बांधली होती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘या’ अभिनेत्रीसाठी कुमार गौरवने दिला होता राज कपूर यांच्या मुलीला लग्नासाठी नकार
दुर्दैवी! राज कपूरांनी ज्या मित्रासाठी 1 रुपयात साईन केला सिनेमा, फ्लॉप झाल्यानंतर त्यानेच सोडले होते जग

हे देखील वाचा