Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड सोनू सूद सीसीएलमध्ये झाला कॅप्टन, स्टार्सच्या क्रिकेट लीगमध्ये होणार धमाका

सोनू सूद सीसीएलमध्ये झाला कॅप्टन, स्टार्सच्या क्रिकेट लीगमध्ये होणार धमाका

सेलिब्रिटी क्रिकेट लीग (CCL) मध्ये अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) पंजाबच्या ‘पंजाब दे शेर’ संघाचे नेतृत्व करणार आहे. सोनू सूदने सांगितले की हा खेळ त्याच्यासाठी चित्रपटांमधून ब्रेक घेण्याची आणि खेळातील आपली सर्वोत्तम कामगिरी दाखवण्याची सुवर्ण संधी आहे. सोनू सूदला पूर्ण विश्वास आहे की यावेळी सीसीएलमध्ये तो आपली सर्वोत्तम कामगिरी करून सीसीएल जिंकेल.

अभिनेता आणि ‘पंजाब दे शेर’चा कर्णधार सोनू सूदने त्याच्या संघाच्या तयारीबद्दल सांगितले. तो म्हणतो, ‘या मोसमापूर्वी आम्ही एकत्र खूप सराव केला आहे आणि आमच्या सरावात आम्ही जी प्रगती पाहिली आहे, आमच्या वेगवान गोलंदाजांनी ज्या प्रकारे कामगिरी केली आहे, त्यामुळे मी आनंदी आहे. मला विश्वास आहे की आमच्याकडे एक मजबूत संघ आहे आणि आम्ही खूप पुढे जाऊ शकतो. या मोसमात आम्ही प्रतिस्पर्ध्यांना कडवे आव्हान नक्कीच देऊ. आणि, मला खात्री आहे की आम्ही या हंगामात जिंकू शकू.

सेलिब्रिटी क्रिकेट लीग 23 फेब्रुवारीपासून शारजाहमध्ये सुरू होत असून अंतिम सामना 17 मार्च रोजी विशाखापट्टणम येथे खेळवला जाईल. 2023 मध्ये तेलुगु वॉरियर्स आणि भोजपुरी दबंग फायनलमध्ये पोहोचले होते. तेलुगू वॉरियर्सने भोजपुरी दबंग्सपेक्षा चांगली कामगिरी करत विजेतेपद पटकावले. 2023 हे CCL साठी संस्मरणीय वर्ष होते आणि तेलुगु वॉरियर्सने चौथ्यांदा CCL जिंकून इतिहासात आपले नाव कोरले.

पंजाब दे शेरचे ब्रँड ॲम्बेसेडर दलेर मेहंदी आणि मिका सिंग आहेत. या सामन्याचे थेट प्रक्षेपण जिओ सिनेमावर होणार आहे. पंजाब दे शेर खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे आहे.

1. सोनू सूद (कर्णधार)

2. मिका सिंग

3. जिमी शेरगिल

4. आयुष्मान खुराना

5. बिन्नू ढिल्लन

6. मनवीर सरन

7. राहुल देव

8. नवराज हंस- फलंदाज

9. जॅझी बी

10 हरमीत सिंग

11. पियुष मल्होत्रा

12. गुलजार चहल

13. रोशन प्रिन्स

14. अमरिंदर गिल

15. अंगद बेदी

16. प्रिन्स हंस

17. राजू शर्मा

18. दिलराज खुराणा

हे देखील वाचा