बॉलिवूडमध्ये लग्न आणि नंतर घटस्फोटाचे किस्से तुम्ही अनेकदा ऐकले असतील. पण आज आम्ही तुम्हाला इंडस्ट्रीतील काही प्रसिद्ध लग्नांबद्दल सांगणार आहोत, जे एकेकाळी खूप चर्चेत राहिल्या होते. कारण, ज्या सुपरस्टार्सनी हे लग्न केले ते आधीच विवाहित होते. एवढेच नाही, तर पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता त्यांनी दुसरे लग्न केले होते. (celebs second marriage without giving first wife divorce)
सलीम खान
या दिग्गज सेलिब्रिटींमध्ये सलमान खानचे वडील सलीम खान ते आलिया भट्टचे वडील महेश भट्ट यांचा समावेश आहे. होय, सलीम खान यांचे पहिले लग्न सलमा खानसोबत झाले होते. यादरम्यान ते हेलन यांच्या प्रेमात पडले. त्यानंतर सलीम यांनी हेलनशी दुसरे लग्न केले. आज हेलन, सलमा आणि सलीम खान एकाच छताखाली राहतात.
महेश भट्ट
त्याचवेळी प्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश भट्ट यांच्याबद्दल बोलायचे झाले, तर त्यांचे पहिले लग्न किरण भट्टसोबत झाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, किरणला घटस्फोट न देता महेश यांनी सोनी रझदानसोबत दुसरे लग्न केले होते.
धर्मेंद्र
या यादीत तिसरे नाव सुपरस्टार धर्मेंद्र यांचे आहे, ज्यांनी देखील दोन लग्न केले आहेत. धर्मेंद्र यांचे पहिले लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झाले होते. त्याचवेळी विवाहित धरम पाजी यांनी प्रकाश कौर यांना घटस्फोट न देता, अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी विवाह केला.
राज बब्बर
या यादीतील पुढचे नाव त्यांच्या काळातील प्रसिद्ध स्टार राज बब्बर यांचे आहे. राज यांचे पहिले लग्न नादिरासोबत झाले होते. मात्र, पहिली पत्नी नादिराला घटस्फोट न देता राज बब्बर यांनी अभिनेत्री स्मिता पाटीलशी लग्न केले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा