वरुण धवनने (Varun Dhawan) आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून केली. ज्यामध्ये आलिया भट्ट (Alia Bhatt) त्याची सहकलाकार होती. या चित्रपटानंतर दोघेही अनेक चित्रपटांमध्ये दिसले आणि त्यांची बॉन्डिंग ऑफ स्क्रीनही जबरदस्त होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वरुणची आलियासोबतची वाढती जवळीक नताशा दलालला त्रास देत होती. चित्रपटांमध्ये वरुण-आलियाचे किसिंग सीन पाहून तिला राग यायचा. दुसरीकडे, त्यावेळी आलिया भट्टला डेट करणारा सिद्धार्थ मल्होत्राही (Sidharth Malhotra) आलियाचे वरुणसोबतचे बाँडिंग पाहून असुरक्षित झाला होता.
यानंतर वरुण-आलियाच्या जवळीकीने नाराज झालेल्या नताशाने शूटवर अभिनेत्याला कंपनी द्यायला सुरुवात केली, जेणेकरून ती त्यांच्यावर लक्ष ठेवू शकेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नताशा ही नॉन फिल्मी पार्श्वभूमीतून आहे, त्यामुळे सुरुवातीला हे सगळं पचवणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. पण हळूहळू तिला बॉलिवूडच्या वर्क कल्चरची सवय झाली आणि तिला समजलं की आलिया-वरूणचं बाँडिंग फक्त एवढंच मैत्री पुरतच मर्यादित आहे. (natasha dalal was insecure with varun dhawan and alia bhatt after seeing their bonding)
वरुण-आलियाचे चित्रपट
‘स्टुडंट ऑफ द इयर’ व्यतिरिक्त वरुण-आलियाने ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘कलंक’ यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. एका मुलाखतीत वरुण धवनने स्वतः सांगितले की, “मला आलियासोबत काम करायला खूप आवडते” कारण दोघांमध्ये खूप छान बाँडिंग आहे. त्याच वेळी, जेव्हा आलिया भट्टला विचारण्यात आले की, कोणता अभिनेता सर्वोत्कृष्ट किसर आहे. यावर उत्तर देताना आलियाने वरुणचे नाव घेतले होते.
हेही वाचा