हिंदी चित्रपटसृष्टीत कपूर कुटुंबातील प्रत्येक सदस्य सुपरस्टार आहे. प्रत्येकाने आपल्या मेहनतीच्या बळावर बॉलिवूडमध्ये अनाेखे स्थान निर्माण केले आहे, पण कपूर कुटुंबातील मुलींचा विचार केला, तर फक्त करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांनीच फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला, तर ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांची लेक अभिनयापासून दूर राहिली. ती दुसरी कुणी नसून रणबीर कपूर याची बहीण रिद्धिमा कपूर आहे, जी तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत होती, पण तरीही तिने स्वत:ला चित्रपटांपासून दूर ठेवले.
लहान वयातच मिळू लागलेल्या चित्रपटांच्या ऑफर्स
रिद्धिमा कपूर (Riddhima Kapoor) हिने जरी अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले, नसले तरी तिला लहान वयातच चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या होत्या. वयाच्या अवघ्या १६-१७व्या वर्षी जेव्हा ती लंडनमध्ये शिकत होती, तेव्हा तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या होत्या.
View this post on Instagram
जेव्हा ती लंडनहून परतली, तेव्हा तिच्या आईने तिला याबद्दल सांगितले, पण रिद्धिमाला कधीच अभिनय क्षेत्रात करिअर करायचे नव्हते. कारण तिला कधीच अभिनयात रस नव्हता. लंडनहून परतल्यावर रिद्धिमाने उद्योगपती भरत साहनी यांच्याशी लग्न केले आणि ती आपल्या कुटुंबात व्यस्त झाली.
रिद्धिमा कपूर आहे ज्वेलरी डिझायनर
रिद्धिमा अभिनयापासून दूर असली, तरी तिचे ज्वेलरी डिझायनिंगमध्ये मोठे नाव आहे. तिने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, तिला सुरुवातीला दागिणे घालायला आवडत नव्हते, पण तिची आई नीतू कपूरसोबत एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान गेली असता, ती दागिन्यांच्या प्रेमात पडली. तिने कस्टम ज्वेलरी डिझाईन करायला सुरुवात केली. त्यानंतर तिच्या डिझाइनचे सर्वांनी कौतुक केले. त्यानंतर रिद्धिमाला या व्यवसायात उतरण्याची कल्पना सुचली आणि आज ती या व्यवसायात चांगली कामगिरी करत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘ब्रह्मास्त्र’ सिनेमात आलियाने केला ‘चिकनी चमेली’वर डान्स; नेटकरी म्हणाले, ‘माफी मागा कॅटरिनाची’
सुनील शेट्टीने ‘हेरा फेरी’ अंदाजात अक्षयला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! तुम्हीही म्हणाल, ‘लय भारी’
शुबमन गिलच्या मित्राने फोडलं भांडं! वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना घेतलं ‘सारा’चं नाव; पण चाहते गोंधळात