Friday, April 19, 2024

शुबमन गिलच्या मित्राने फोडलं भांडं! वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना घेतलं ‘सारा’चं नाव; पण चाहते गोंधळात

भारतीय क्रिकेटपटू शुबमन गिल याने गुरुवारी (दि. 08 सप्टेंबर) त्याचा 23वा वाढदिवस साजरा केला. यावेळी त्याला शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांसोबत त्याच्या मित्रमंडळींची रांगच लागली होती. अशातच त्याच्या एका मित्राने त्याला वाढदिवसाच्या भन्नाट शुभेच्छा दिल्या. त्याच्या मित्राने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सारा हे नावही वापरले, ज्याची चर्चा सध्या जोरदार रंगली आहे. यामुळे ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

खरं तर, शुबमन गिल (Shubman Gill) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) नुकतेच एकत्र डिनर डेटवर स्पॉट झाले होते. त्यांचे फोटोही व्हायरल झाले होते.

शुबमन गिल आणि सारा तेंडुलकरच्या अफेअरच्या चर्चा
शुबमन गिल आणि सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) यांच्या अफेअरच्या चर्चाही माध्यमांमध्ये चांगल्याच रंगल्या आहेत. मात्र, नंतर असे वृत्त आले होते की, दोघांचेही ब्रेकअप झाले आहे. आता शुबमनच्या मित्राच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Color (@bollywood.color)

शुबमन गिलच्या मित्राने लिहिले ‘खूप जास्त (सारा) प्रेम’
शुबमन गिल याचा मित्र खुशप्रीत सिंग याने शुबमनसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. यासोबतच त्याने पोस्टला कॅप्शन देत लिहिले की, “बहुत सारा प्यार”. म्हणजेच खूप जास्त प्रेम. यावेळी त्याने सारा हे नाव लिहिले आहे. त्यामुळे त्याच्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Khushpreet Singh Aulakh (@kpaulakh13)

सारा अली खान की सारा तेंडुलकर?
मात्र, ती मुलगी सारा तेंडुलकर आहे की, सारा अली खान यावरून चाहत्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “कॅप्शन खूप विचार करून लिहिले आहे. नक्कीच खूप जास्त (सारा) प्रेम.” महत्त्वाचं म्हणजे, या पोस्टवरच्या कमेंट दिसत नाहीयेत. कदाचित शुबमनच्या मित्राने कमेंट्स सेक्शन बंद केलं असल्याचं बोललं जातंय.

सारा तेंडुलकर ही सचिन तेंडुलकरची लेक असून ती सोशल मीडियावरही चांगलीच प्रसिद्ध आहे. तसेच, तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांची पसंती मिळते. दुसरीकडे, अभिनेत्री सारा अली खानबद्दल बोलायचं झालं, तर सारा ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सारा अली खान 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अतरंगी रे’ या सिनेमात झळकली होती. मात्र, हा सिनेमा जोरदार आपटला होता. आता साराच्या खात्यात ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ हा सिनेमा आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
विमानतळावर अचानक धावायला लागली अभिनेत्री काजोल, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
‘द कपिल शर्मा शो’चा प्रोमो शूट केल्यानंतर चंदन प्रभाकरने साेडला शो, कृष्‍णा अभ‍िषेक देखील दिला डच्चू
पंजाबी सिंगर हनीसिंग आणि पत्नी शालिनीचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार ‘इतक्या’ कोटींची संपत्ती

हे देखील वाचा