Tuesday, June 3, 2025
Home बॉलीवूड सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाच्या चर्चांमध्ये दुसऱ्याच अभिनेत्रीने उरकला लग्नसोहळा, पाहा व्हायरल फोटो

सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाच्या चर्चांमध्ये दुसऱ्याच अभिनेत्रीने उरकला लग्नसोहळा, पाहा व्हायरल फोटो

सध्या मनोरंजन क्षेत्रामध्ये लग्नसराई सुरु झाली आहे. नुकतंच बॉलिवूडचा ‘अण्णा’ म्हणून ओळखला जाणार अभिनेता सुनील शेट्टी याची लाडकी लेक आथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर के एल राहुल याच्या सोबत लग्न बंधानतच अडकील आहे. अशातच आता बॉलिवूडमधील प्रसिद्ध ‘शेरशाह‘ जोडी म्हणजेच कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या देखिल लग्नाच्या सर्वत्र चर्चा सुरु आहेत. अशातच एका दुसऱ्याच अभिनेत्रीने (दि, 4 फेब्रुवारी) रोजी थाटामाटात लग्नसोहळा उरकला आहे. ज्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलत आहोत तिने 2007 साली प्रदर्शित ‘चक दे इंडिया‘ (Chack De India) चित्रपटामध्ये अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) सोबत काम केलेली चित्राशी रावत (Chitrashi Ravat). हिने काही दिवसांपूर्वीच तिच्या साखरुड्याचे फोटो आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केले होते. आता ही अभिनेत्री लग्नबंधनात अडकली आहे. तिने आपला बॉयफ्रेंड ध्रुवादित्य भगवानानी (Dhruvaditya Bhagwanani) सोबत सात जन्माच्या गाठी बांधल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

चित्राशी रावत आणि बॉयफ्रेंड ध्रुवादित्य भगवानानी हे दोघे अनेक दिवसापासून एकमेकांना डेट करत होते आता यांनी आपल्या नात्याला लग्नाबंधनात अडकवले आहे. यांचे फोटो विरल भय्यानीने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, जे सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहेत. तर चाहते देखिल त्यांच्या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chitrashi Rawat (@chitrashi)

चित्राशी सारखंच ध्रुवादित्यही एक अभिनेता आहे. त्याने ‘फ्लाइट’ आणि ‘द ग्रे’ सारख्या चित्रपटांमद्ये काम केलं आहे. हे दोघेही गेल्या 11 वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. ज्यानंतर त्यांनी (दि, 4 फेब्रुवारी) रोजी लग्नगाठ बांधली. चित्राशी बद्दल सांगायचं झालं तर तिने शाहरुख सोबत ‘चक दे इंडिया’ चित्रपटामधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. हा चित्रपट भारतीय माहिलांवर अधारित होता, ज्यामध्ये चित्राशीने कोमल चौटाला नावाची भूमिका निभावली होती. हा चित्रपट खूप गाजला होता. आजही यामधील गाणी प्रेक्षकांच्या पंसतीस उतरले जातात. या चित्रपटामुळे चित्रशी प्रसिद्धी झोतात आली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
धक्कादायक! टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ विजेता कोमोलिकाचा कार अपघात
अमिताभ बच्चन यांच्या मुलाला पाहण्यासाठी जेव्हा गावकऱ्यांनी केली होती गर्दी, अभिषेक बच्चनने केला ‘तो’ प्रसंग शेअर

हे देखील वाचा