Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिनंदन! ‘चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेता झाला बाबा, कन्यारत्न झाल्याची दिली बातमी

चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम जवळपास सहा वर्षांपूर्वी सुरू झाला. पाहता पाहता या कार्यक्रमाला सहा वर्षे पूर्ण झाली. हा कार्यक्रम इतका गाजला इतका गाजला की बॉलिवूड स्टार्सना देखील या कार्यक्रमाची भुरळ पडली आणि ते देखील त्यांच्या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमामध्ये हजेरी लावतात.

निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे, भारत गणेशपुरे, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे आणि अंकुर वाढवे ही सात मंडळी गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला खळखळून हसवत आले आहेत. आज या कर्यक्रमातील कलाकारांचा स्टेटस कुठल्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा कमी नाहीये. या कलाकारांच्या बारीक बारीक गोष्टींवर माध्यमांचं लक्ष असतं. त्यामुळे स्टुडिओमध्ये असो व स्टुडिओच्या बाहेर या कलाकारांना कॅमेऱ्याशिवाय गत्यंतर नाही असंच म्हणावं लागेल.

असो या टीममधील एका कलाकाराबरोबर आयुष्यातील सर्वात महत्त्वाची बाब घडली आहे आणि ही बातमी त्याने स्वतः इतरांना शेअर केली आहे. हा कलाकार दुसरा तिसरा कुणी नसून स्वतः अंकुर वाढवे आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान ही म्हण जणू काही अंकुर साठीच बनलेली आहे. अशा पद्धतीने तो सतत काम करत असतो. अंकुर हा स्वतः सोशल मिडियावर फार ऍक्टिव्ह असतो. त्याच्या अनेक महत्त्वाच्या बाबींबद्दल तो सोशल मिडियावरूनच माहिती देत असतो. आताही त्याने तसंच केलं आहे. अंकुर वाढवे आता एका मुलीचा बाबा झाला आहे. त्याने स्वतः इंस्टाग्रामवर बायको आणि लेकीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने, ‘ मी नवीन पात्रात आता प्रवेश केला असून एक मुलीचा बाप झालोय.’ असं लिहिलं आहे. त्याच्या या पोस्टवर हजारो लाईक्सचा पाऊस पडला आहे आणि चहू बाजूंनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील सगळ्याच कलाकारांच्या भूमिका रसिकांच्या मनात घर करून आहेत. अगदी त्याच प्रमाणे अंकुर वाढवे या कलाकारावरही रसिक भरभरून प्रेम करतात. याच कार्यक्रमाने अंकुरला ओळख मिळवून दिली.

२८ जून २०१९ ला अंकुरचा विवाह पार पडला. कोर्ट मॅरेज करत त्याने त्याच्या आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली होती. अंकुर अभिनेत्यासोबत उत्तम कवीदेखील आहे. त्याच्या ‘पुन्हा प्रेमगीत गाण्यासाठी’ या कविता संग्रहाचं प्रकाशन देखील करण्यात आले होतं. त्याने करून गेलो गाव, गाढवाचं लग्न, सर्किट हाऊस, आम्ही सारे फर्स्ट क्लास, सायलेन्स, निम्मा शिम्मा राक्षस आणि कन्हैया या नाटकांमध्ये काम केले आहे.

हे देखील वाचा