Sunday, April 14, 2024

अभिनेते चंदन के आनंद यांनी सांगितल्या त्यांचा इंडस्ट्रीमधला कास्टिंग काऊचचा विदारक अनुभव

मनोरंजनाविश्वासाठी कास्टिंग काऊच हा शब्द आणि या घटना काही नवीन नाही. आजपर्यंत अनेक मोठमोठ्या कलाकारांना या विकृत गोष्टीचा सामना करावा लागला आहे. अनेक कलाकार समोर येत त्यांच्या याबद्दलचा अनुभव सांगताना आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी याबद्दल त्यांचे अनुभव सांगितले आहे. आता चित्रपट, टेलिव्हिजन, ओटीटी अशा सर्व माध्यमांमध्ये काम करणारे प्रतिभावान अभिनेते चंदन के आनंद यांनी नुकताच त्यांचा कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले.

कास्टिंग काऊचवर बोलताना त्यांनी सांगितले की, “याला आधी कॉम्प्रोमाइज म्हटले जायचे. माझ्या पूर्ण करियरमध्ये मी एका को-ऑर्डिनेटरला भेटलो होतो. त्याने मला सांगितले की, माहित आहे ना कॉम्प्रोमाइज करावे लागते. मी म्हटले हे काय असते. तर तो म्हणाला फोटो दे मग बोलवतो. त्यानंतर मी त्या को-ऑर्डिनेटरच्या ऑफिसमधून पळालो. मला वाटतो की असे लोकं संपूर्ण जगात आहे. मात्र त्यांचा मुख्य हेतू लपलेला आहे. तुम्हाला तुमच्या मूल्यांवर आणि सिद्धांतांवर टिकून राहावे लागते. मजबूत व्हावे लागते. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या सोबत आहात तोपर्यंत तुमच्यासोबत काहीही होणार नाही.” चंदन के आनंद यांनी मोठ्या संघर्षाने आणि मेहनतीने त्यांचे करियर घडवले. अनेक मोठ्या कलाकारांसोबत त्यांनी अभिनय केला आहे.

अभिनेते चंदन के आनंद यांनी अनेक टीव्ही शो, चित्रपट आणि नेटफ्लिक्स क्लास सारख्या ओटीटी शोमध्ये काम केले आहे. त्यांनी जान्हवी कपूरच्या ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’ आणि इम्तियाज अली ‘लव आज कल’ आदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोबतच दुर्गा और चारू, बॅरिस्टर बाबू, अली बाबा दास्तान-ए-काबुल, मीत, झांसी की रानी, ​​ये प्यार ना होगा कम आदी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आदिल तुरुंगात जाताच राखी अन् शर्लिनची पुन्हा झाली मैत्री, पाहा व्हायरल व्हिडिओ
भांड फुटलं रे! स्वरा भास्करने केले समाजवादी पक्षाच्या ‘फहाद अहमद’साेबत लग्न, पाहा व्हिडिओ

हे देखील वाचा