Saturday, July 6, 2024

सर्वत्र घुमणार ‘चंद्रमुखी’चा आवाज, प्रसाद ओकचा नवीन चित्रपट लवकरच होणार प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक नवीन चित्रपट येत आहेत. लॉकडाऊननंतर चित्रपटगृहे बंद होती त्यामुळे बरेच चित्रपट प्रदर्शित झाले नाही. अनेक निर्मात्यांनी चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यास पसंती दर्शवली. तर काहींनी चित्रपट गृहात चित्रपट प्रदर्शित केले. अशातच आणखी एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटूला येणार आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘चंद्रमुखी’ हा चित्रपट चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’ या सुपरहिट चित्रपटांनंतर प्रसाद ओकचा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतेच या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आहे.

प्रसाद ओकने हा टिझर त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या टीझरमध्ये ढोकलीचा नाद, घुंगराचे बोल, आणि एक नृत्यांगना दिसत आहे. या टीजरमध्ये त्या नृत्य करणाऱ्या स्त्रीचा चेहरा दिसत नाहीये. परंतु टिझर पाहता चित्रपट काहीतरी भन्नाट असणार आहे, याची कल्पना येत आहे. हा टिझर शेअर करून त्याने लिहिले आहे की, “तो ध्येय धुरंधर राजकारणी… ती तमाशातली शुक्राची चांदणी… लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची… राजकीय रशिली प्रेमकहाणी… २९ एप्रिल पासून तमाशाचा खेळ पडद्यावर सजणार, अजय-अतुलची गाणी पुन्हा एकदा वाजणार!” (chandramukhi teaser released, prasad oak share post)

या टिझर पाहून प्रेक्षकांच्या मनात चित्रपटाबाबत खूप उत्सुकता निर्माण झाली आहे. चंद्रमुखी हा चित्रपट २९ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. तसेच टीझरमध्ये दिसणारी स्त्री कोण आहे. याबाबत सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. हा चित्रपट विश्वास पाटील यांच्या चंद्र्मुखी या कादंबरीवर आधारित आहे. अजय अतुल या चित्रपटातील गाण्यांना संगीत देणार आहे. परंतु या चित्रपटात आणखी कोण कलाकार असणार आहेत याची माहिती समोर आली नाही.

हेही वाचा :

हे देखील वाचा