Monday, May 13, 2024

पैशा आयुष्यभर पुरत नाही! एकेकाळी कुत्र्यांना गाडीत फिरवणाऱ्या कुकू मोरेचा उपचाराअभावी झाला होता मृत्यू

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्रींच्या ऐशारामी जिवनशैलीची नेहमीच चर्चा होत असते. त्यांच्या महागड्या गाड्या, कपडे यांपासून ते त्यांच्या हातातील बॅगा सुद्धा प्रचंड महाग असतात. त्यांच्या याच महागड्या वस्तूंची चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये होत असते. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य होईल की, या आधी चित्रपटसृष्टीत अशी सुद्धा अभिनेत्री होती जिने आपल्या कुत्र्यांसाठीसुद्धा गाडी घेतली होती. काय आहे हा किस्सा जाणून घेऊ.

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध नृत्य करणार्‍या अभिनेत्रींमध्ये हेलेन आणि वैजयंती माला यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. मात्र त्यांच्या आधीही एक अशी नृत्यअभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीत होती जिच्या नृत्याच्या ठेक्याचे असंख्य चाहते होते. ती अभिनेत्री म्हणजेच कुकू मोरे. 50 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून कुकू मोरेचे नाव आजही घेतले जाते. ती आपल्या कसदार अभिनयासाठी, नृत्यासाठी आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्यासाठी विशेष प्रसिद्ध होती. चित्रपटा इतकीच तिच्या ऐशारामी आणि चैनी जिवनशैलीची सर्वत्र चर्चा होत असायची. मात्र आपल्या शेवटच्या काळात तिच्याकडे उपचारासाठी सुद्धा पैसे राहिले नव्हते. जाणून घेऊ या कुकू मोरेच्या आयुष्याबद्दल.

कुकू मोरे आणि हेलन यांची घनिष्ठ मैत्री होती. कुकू मोरे आपल्या अभिनयात इतकी पारंगत होती की, ती नृत्य करताना तिला पाहणे म्हणजे चाहत्यांसाठी एक पर्वणीच होती. कुकूमुळेच त्या काळात कॅब्रेडान्स प्रसिद्ध झाला होता. त्या काळात ती एका गाण्यासाठी तब्बल 6000 रुपये इतके मोठे मानधन घेत होती. आपल्या खासगी आयुष्यातही ती नेहमी चर्चेत होती. त्या काळात तिच्याकडे तीन आलिशान गाड्या होत्या, ज्यामध्ये एक गाडी तिने तिच्या कुत्र्यांसाठी ठेवली होती. याच उदाहरणातून तिच्या खर्चिक जीवनशैलीचा आपल्याला अंदाज येईल. सोने, अनेक फ्लॅट तिने घेऊन ठेवले होते. मात्र तिचे हे सगळे ऐश्वर्य कायमचे टिकू शकले नाही.

कुकू मोरेवर त्या काळात आयकर विभागाने कारवाई केली होती. ज्यामध्ये ती दोषी आढळून आली. या कारवाईने तिच्याकडे असणारी सगळी संपत्ती जप्त करण्यात आली. त्याच काळात तिने प्रेम केलेल्या एक दिग्दर्शकही तिला सोडून गेला त्यामुळे ती पूर्णपणे रस्त्यावर आली होती. त्याच दरम्यान तिला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. मात्र कुकूने सगळया संकटांना निर्भीडपणे तोंड दिले. तिला चित्रपटात काम मिळणेही बंद झाले होते. अस म्हणतात की, त्या वेळी तिच्याकडे आपल्या उपचारासाठी सुद्धा पैसे नव्हते. यातच तिचा मृत्यू झाला. आपल्या कुत्र्यांसाठी सुद्धा गाडी वापरणाऱ्या एका श्रीमंत नायिकेचा शेवट मात्र खूपच दुःखद झाला.

हेही वाचा :

हे देखील वाचा