Sunday, August 3, 2025
Home बॉलीवूड सलमानच्या नावावर परदेशात जाण्याची परवानगी मागणाऱ्या जॅकलिनचे खोटे ईडीने पकडले आणि अभिनेत्रीने…

सलमानच्या नावावर परदेशात जाण्याची परवानगी मागणाऱ्या जॅकलिनचे खोटे ईडीने पकडले आणि अभिनेत्रीने…

सध्या जॅकलिन फर्नांडिस तिच्या मनी लॉंडरिंग केसमध्ये अडकली असून त्यामुळे ती खूपच गाजताना दिसत आहे. या केसमुळे जॅकलिनवर अनेक बंधनं लादण्यात आली असून, तिला या केसमुळे परदेशात जाण्यास देखील मज्जाव करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच तिने कोर्टामध्ये परदेशात जाण्यासाठी परवानगी मागितली होती. तिने कोर्टात सांगितले की, तिला सलमान खानच्या नेपाळमध्ये होणाऱ्या ‘द बँग’ या टूरचा हिस्सा व्हायचे असल्याने तिला परदेशात जायचे. मात्र प्रवर्तन निदेशालयने जॅकलिनच्या यासर्व दाव्यांना खोटे ठरवले. पुढे जॅकलिननेच तिची ही विनंती मागे घेतली.

प्राप्त माहितीनुसार, जॅकलिनने दिल्लीच्या कोर्टात परदेशात जाण्याचा अर्ज केला जोतं. तिने कोर्टात सांगितले की, परदेशात होणाऱ्या अनेक कार्यक्रमांचा ती हिस्सा असल्याने तिला अबुधाबीमध्ये होणाऱ्या आयफा पुरस्कार, फ्रांसमध्ये होणाऱ्या कान्स फेस्टिवल आणि सलमान खानच्या ‘द बँग’ आदी कार्यक्रमांमध्ये तिला सामील व्हायचे आहे. जॅकलिनने कोर्टात तिचे वेळापत्रक सांगितले की, १७ मे पासून २२ मे पर्यंत आयफासाठी अबुधाबीला जायचे आहे. त्यानंतर कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सामील व्हायचे आणि नंतर २७ आणि २८ मे ला तिला नेपाळला जायचे आहे. मात्र ईडीने याबद्दल चौकशी केल्यानंतर आयफा पुरस्कार जूनपर्यंत स्थगित झाले असून, सलमानच्या टूरचा ती भाग बनणार नाही. ही माहिती ईडीने कोर्टात दिल्यानंतर जॅकलिनने तिचा अर्ज परत घेतला आहे.

जॅकलिन फर्नांडिसचे नाव सुकेश चंद्रशेखरकडून करण्यात आलेल्या २०० कोटी रुपयांच्या फ्रॉडमध्ये अडकले आहे. याच पैशातून जॅकलिनला त्याने काही भेटवस्तू दिल्याचे देखील सांगण्यात आले. सध्या जॅकलिनचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा