सध्या अभिनेत्री छवी मित्तल तिला झालेल्या कॅन्सरसोबत लढत आहे. आलेल्या या मोठ्या संकटाचा सामना अतिशय सकारात्मक राहून आणि हसतमुखाने करत ती या आजाराला हरवत आहे. नुकतीच छवीवर एक दुर्धर शस्त्रक्रिया झाली. सध्या छवी या शस्त्रक्रियेनंतर लवकरच बरे होते आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या छवीने तिच्या या आजाराच्या निदानानंतर ते शस्त्रक्रियेपर्यंतचा सर्वच प्रवास तिच्या फॅन्ससोबत शेअर केला आहे. या आजारातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असलेल्या छवीने नुकताच तिचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये छवी तिच्या हॉस्पिटलमध्येच असणाऱ्या एका सलूनमध्ये गेलेली दिसत आहे.
तिने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, छवी तिच्या हॉस्पिटलच्या लॉबीमध्ये टोपी, मास्क आणि हॉस्पिटलच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्यानंतर ती सलूनमध्ये जाते आणि तिथे केस धुते आणि ब्लो ड्राय करते. या व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले की, “हे करण्याआधी मी खूपच नर्वस होती. मात्र आता मला अभिमान वाटतो की, मी हे केले.” तर कॅप्शनमध्ये लिहिले की, “हो करण्याआधी मी खूपच घाबरत होती. हो मी हॉस्पिटलच्या सलूनमध्ये गेली होती. कधी विचार नव्हता केला की, शाम्पू केल्यानंतर इतका आनंद मिळेल. काही मोठ्या गोष्टी तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती आनंद आहे, याची जाणीव करून देतात. मला स्वतःवरच अभिमान वाटत आहे, की मी लिफ्टमधून जात खाली सलूनमध्ये माझे केस धुण्यासाठी गेली आणि तिथे बसून केस धुतले. माझ्यासाठी ही खूपच मोठी उपलब्धी आहे.”
पुढे तिने सांगितले की, “मी आज सर्वात त्रासदायक आणि आतापर्यंतचे सर्वात संथ मात्र तरीही फ्रेश शॉवर घेतले. पुनः एकदा सर्वाना धन्यवाद. आणि अजून एकदा भुयाराच्या शेवटी नेहमीच उजेड असतो.” छवीच्या या सकारत्मक भूमिकेबद्दल सर्वच फॅन्स आणि कलाकार तिचे कौतुक करत आहेत. छवीवर नुकतीच कॅन्सरवर शस्त्रक्रिया झाली असून, आता ती यातून बाहेर येत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- दमदार, डॅशिंग दाक्षिणात्य सुपरस्टार अजित कुमार वाढदिवस, या चित्रपटांमध्ये साकारली डॅशिंग भूमिका
- ‘दिल, दिमाग और बत्ती’ चित्रपटातून अभिनेता सागर संत याचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण
- ‘आम्ही खूप कॅलरीज बर्न करतो’ म्हणत, आयुष्मान खुरानाच्या पत्नीने शेअर केले बेडरुम सिक्रेट