×

‘दिल, दिमाग और बत्ती’ चित्रपटातून अभिनेता सागर संत याचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण

दिल, दिमाग और बत्ती’ या मराठी चित्रपटाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा आहे. सत्तर-ऐंशीच्या दशकातील चित्रपटांचा फिल्मी तडका या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच रंजक कथा आणि भरपूर अ‍ॅक्शन सीन असलेला हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी निर्मात्यांना आशा आहे. अभिनेता सागर संत या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. अनेक एकांकिका स्पर्धा गाजवल्यानंतर सागरने काही हिंदी शॉर्ट फिल्मचे दिग्दर्शन केले होते. आता तो ‘दिल दिमाग और बत्ती’ चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत प्रवेश करत आहे.

‘दिल दिमाग और बत्ती’ चित्रपटाला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिलेले आहे. यासह गीतकार हृषीकेश गुप्ते यांच्या गीतांना अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, रोहीत राऊत, जान्हवी प्रभू अरोरा, मुग्धा कराडे यांचा आवाज लाभला आहे. ‘सा क्रिएशन्स’ची पहिलीच निर्मिती असलेल्या ‘दिल दिमाग और बत्ती’ या मराठी चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक स्वतः हृषीकेश गुप्ते आहेत.

चित्रपटात दिलीप प्रभाळकर, सागर संत, संस्कृती बालगुडे, वंदना गुप्ते, पुष्कर श्रोत्री, किशोर कदम, आनंद इंगळे, वैभव मांगले, सागर संत, मयुरेश पेम, सखी गोखले, पुष्कराज चिरपुटकर, रेवती लिमये, मेघना एरंडे, संजय कुलकर्णी, विनीत भोंडे असे कलाकार दिसत आहे. त्यामुळे त्यांचा चित्रपट देखील तसाच भन्नाट असेल यात काही वाद नाही.

‘दिल दिमाग और बत्ती’ हा चित्रपट येत्या ६ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांना ही धम्माल मस्ती आवडली आहे. त्यामुळे सगळेच आता या चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post