Thursday, November 14, 2024
Home मराठी नवरदेव Bsc Agri सिनेमात भाव खाऊन गेलाय ‘छोटा पुढारी’ घनश्याम दरोडे, पाहा सिनेमाचा नवा कोरा ट्रेलर

नवरदेव Bsc Agri सिनेमात भाव खाऊन गेलाय ‘छोटा पुढारी’ घनश्याम दरोडे, पाहा सिनेमाचा नवा कोरा ट्रेलर

बहुचर्चित मराठी सिनेमा नवरदेव Bsc agri (Navardev Bsc Agri ) चा ट्रेलर गुरुवारी रिलीज करण्यात आला आहे. या सिनेमात पाहुण्या भूमिकेत एक दिग्गज मराठी कलाकार दिसला आहे. तसेच मुळशी पॅटर्न सिनेमातील अतिशय गाजलेला डायलॉग तो या सिनेमातही बोलताना दिसला आहे. याशिवाय छोटा पुढारी म्हणून अखंड महाराष्ट्राला परिचीत असलेला धनश्याम दरोडेही ( Chhota Pudhari Ghanshyam Darode) या सिनेमात दिसणार आहे.

नवरदेव Bsc agri सिनेमात मुख्य भूमिकेत क्षितीज दाते, रमेश परदेशी, मकरंद अनासपुरे(Makrand Anaspure), प्रविण तरडे, प्रियदर्शनी इंदलकर(Priydarshani Indalkar), नेहा शितोळे, संदिप पाठक, हार्दिक जोशी, तानाजी गालगुंडे(Tanaji Galgunde), अनिरुद्ध कुतवड आणि विनोद वनवे हे कलाकार दिसत आहेत. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन राम खाटमोडे यांनी केले आहे.

हा सिनेमा हा उच्चशिक्षीत अशा शेतकरी तरुणावर बेतलेला आहे. ज्याने बीएससी ॲग्रीचे शिक्षण पुर्ण केले असून त्याला लग्नासाठी मुलगी मिळत नाही, असा काहीसे सिनेमाचे कथानक आहे. नेहमीप्रमाणे यात मराठी सिनेमातील ट्विस्ट, इमोशन्स, कॉमेडी व ड्रामा पाहायला मिळतो. ट्रेलरमध्ये शहरात शिक्षण घेत असलेल्या मुलांबरोबर मुली लग्नाला तयार होतात, परंतू ग्रामीण किंवा शेतकरी तरुण कितीही कमवत असला तरी त्याच्याशी लग्नाला नको म्हणतात हे अधोरेखित केले आहे. प्रविण तरडे(Pravin Tarade) हे देखील या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दिसले असून ‘शेती विकायची नाही राखायची असते’ हा लोकप्रिय डायलॉग म्हणताना दिसले आहे.

शिक्षीत (Kshitij Date)शेतकऱी तरुणाची भूमिका करताना क्षितीज दाते थोडासा भाव खाऊन जातो. रमेश परदेशी(Ramesh Pardeshi) हा क्षितीजच्या मोठ्या भावाची भूमिका करताना दिसत आहे तर तुझ्यात जीव रंगला फेम राणा दा अर्थात हार्दिक जोशी या सिनेमात पहिल्यांदाच निगेटिव्ह भूमिकेत दिसला आहे. ट्रेलरमध्ये सरप्राईज पॅकेज म्हणजे छोटा पुढारी घनश्याम दरोडेचाही (Chhota Pudhari Ghanshyam Darode)रोल आहे. तो क्षितीजची फिरकी घेताना ट्रेलरमध्ये दिसत आहे.

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा