कलाकारांबाबत नेहमीच फॅन्समध्ये एक वेडेपणा भरलेला असतो. आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल प्रेम व्यक्त करताना फॅन्स कधीकधी काय करतील याचा नेम नाही. फॅन्सच्या मनात कलाकारांबद्दल असलेले प्रेम हे त्यांच्या वेगवेगळ्या कृतीतून अनेकदा समोर आल्याचे आपण पाहिले आहे. मात्र, अभिनेता सोनू सूदसाठी लोकांचे प्रेम हे त्यांच्यासाठी फक्त एक भावना नसून एक जाणीव आहे, एक आदर आहे. सोनूने कोरोनाच्या काळात गरजू आणि गरीब लोकांसाठी जे काही काम केले आहे, त्याच कामामुळे लोकांच्या मनात त्याच्याबद्दल अतिशय खास जागा तयार झाली आहे.
सोनूबद्दल प्रेक्षकांच्या आणि त्याच्या फॅन्सच्या मनात एक वेगळी आणि अढळ जागा निर्माण झाली आहे. अनेकदा त्याच्याबद्दल लोकांच्या मनात असलेले प्रेम वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होताना आपण पाहिले आहे. मात्र, सध्या सोनूचा एक छोटा फॅन आणि त्याची एक कृती चांगलीच चर्चेत आली आहे. तेलंगणाच्या सांगारेड्डी येथे राहणारा सात वर्षांचा विराट नावाचा सोनूचा एक छोटा फॅन आहे. याने सोनूबद्दल त्याचे प्रेम व्यक्त करताना जी काही कृती केली आहे, त्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे.
विराट टीव्हीवर सोनूचा एक चित्रपट बघत होता. हा चित्रपट बघताना एका सीनमध्ये सोनूला कोणीतरी खूप मारताना त्याला दिसले आणि त्याने चक्क त्याच्या घरातला टीव्हीच फोडून टाकला. ही घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच रंगताना दिसत आहे. सोबतच विराटचे फोटो आणि व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत.
एका तेलुगू न्यूज चॅनेलने या बातमीची क्लिप शेअर केली आहे. या बातमीवर खुद्द सोनूने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. सोनूने या व्हिडिओला रिट्विट करत लिहिले, “अरे तुम्ही तुमचे टीव्ही तोडू नका. आता त्या मुलाचे वडील माझ्याकडे नवीन टीव्ही मागणार आहेत.”
Arrreee, Don't break your TVs,
His dad is going to ask me to buy a new one now ???????? https://t.co/HB8yM8h1KZ— sonu sood (@SonuSood) July 14, 2021
सोनूच्या या ट्विटवर अनेक फॅन्सने आणि नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स करत त्याला रिप्लाय दिला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-










