आजकाल सुंदर दिसण्याच्या व्याख्या बदलताना दिसतायेत, आपण आहोत त्यापेक्षा सुंदर दिसण्याच्या प्रयत्न अनेक अभिनेत्री करत असतात. त्यातील एक म्हणजे ‘गाओ लियू’. चिनी अभिनेत्री आणि गायिका ‘गाओ लियू’ हीने सध्याच कॉस्मेटिक सर्जरी केली. परंतु गाओ लियू हिला कॉस्मेटिक सर्जरी चांगलीच महागात पडली आहे.
आताच गाओचे काही फोटोज् सोशल मीडियावर वायरल झाले आहेत. ज्यात नाकाच्या सर्जरी नंतर त्याच्या नाकावर काळे डाग पडलेले दिसत आहेत. ट्विटर सारख्या चिनी प्लॅटफॉर्म वेईबोवर या अभिनेत्रीने सर्जरी च्या आधीचे आणि नंतरचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गाओ हीचा सोशल मीडियावरील पोस्टनंतर तिच्या काही फॅन्सने तिच्या सर्जरी बाबतीत चिंता व्यक्त केली आहे.
खर सांगायचं झाल्यास एका मैत्रिणीच्या सल्याने गाओने एका कॉस्मेटिक क्लिनिकमध्ये नाकाची सर्जरी केली होती. ही सर्जरी जवळपास 4 तास चालू होती. ४ तासाच्या सर्जरीनंतर गाओला पाहिजे तसा नाकाचा आकार नाही मिळाला. या सर्जरीमध्ये तिच्या नाकाचे काही टिशुज मरून गेले आणि नंतर गाओला असं समजलं की जी सर्जरी तिने केली आहे ती सर्जरी करण्याची परवानगी त्या क्लिनिकला नाहीये.
गाओ लियूने आपल्या ५ मिलियन फोलोवर्स सोबत जो फोटो शेअर केला आहे, त्यात तिच्या सगळ्या चाहत्यांनी पाहिले की तिचे नाक पूर्णपणे काळे पडले आहे. तिचे हे फोटोज् चिनी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्या फोटोला प्रेक्षकांकडून खूपच सहानुभूति मिळाली आहे. बऱ्याच प्रेक्षकांनी कॉस्मेटिक सर्जरी विरोधात प्रश्न उपस्थित केले आहेत. असच बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्रींनी सर्जरी केली आहे.पण त्यांना पाहिजे तसा रिझल्ट नाही मिळाला.
अभिनेत्री गाओ लियू हीने असे म्हंटले आहे की, नाकाची चुकीची सर्जरी केल्यामुळे तिच्या हातातले २ कामं निघून गेली. ज्यामुळे तिला करोडो रुपयांचं नुकसान झालं आहे आणि तिच्या नाकाचा आकार देखील बिघडला आहे.










