Wednesday, June 26, 2024

मुलाच्या ‘जहांगीर’ नावामुळे चिन्मय मांडलेकर ट्रोल, महाराजांची भूमिका कधीही न साकारण्याचा घेतला निर्णय

मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका निभावून अनेक प्रेक्षकांच्या मनात त्याचे हक्काचे असे स्थान निर्माण केलेले आहे. परंतु यामुळे चिन्मय मांडलेकरला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. काही दिवसापूर्वीची त्याने एका शोमध्ये त्याच्या मुलाचं नाव जहांगीर असल्याचे सांगितले. आणि त्यानंतर त्याच्यावर टीका होऊ लागली. ही टीका त्याच्यापुरताच मर्यादित न राहता त्याच्या मुलावर आणि बायकोवरही होऊ लागली. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारूनही मुलाचं नाव जहागीर असं ठेवल्याने अनेकांनी त्याला ट्रोल केले. परंतु आता त्याला हा त्रास सहन झाला नाही आणि त्याने व्हिडिओ शेअर करून त्याचा संताप व्यक्त केलेला आहे.

 

इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करून त्याचा एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. इथून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका पडद्यावर साकारणार नाही. असे त्यांनी सांगितले आहे. त्याच्या कुटुंबाला यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. असे देखील त्यांनी सांगितलेले आहे. दिग्पाल लांझेकर यांच्या शिवराय अष्टक या चित्रपटांमधील सर्व चित्रपटांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे भूमिका साकारलेली आहे. परंतु ही भूमिका साकारणार नाही असा त्यांनी निर्णय घेतलेला आहे.

instagram वर त्याचा एक व्हिडिओ शेअर करून त्याने म्हटले आहे की, “नमस्कार माझे नाव चिन्मय मांडलेकर व्यवसायाने मी अभिनेता, लेखक दिग्दर्शका, निर्माता आहे. काल माझ्या पत्नीने नेहाने व्हिडिओ शेअर केला. त्यात माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे. त्याच्या नावावरून होणारे ट्रोलिंग आणि कुटुंबाबद्दल पास केलेल्या अतिशय घाणेरड्या अश्लील कमेंट्स आहेत. आता अनेक लोकही मुलाच्या पितृत्वापासून ते आईच्या चरित्रापर्यंत संशय घेऊ लागलेले आहेत. एक व्यक्ती म्हणून मला हा त्रास होतो. मी अभिनेता आहे. पण म्हणून मला माझ्या मुलाला आणि पत्नीला कुठल्याही पद्धतीचा मानसिक त्रास सोशल मीडियावर होत असेल, तर त्यासाठी मी बांधील नाही. माझ्या कामावरून मला वाटेल ते बोलू शकता. आवडलं नाही आवडलं पण माझ्या वैयक्तिक आयुष्यभर बोलण्याचा हक्क तुम्हाला आहे असं मला वाटत नाही.”

चिन्मय मांडलेकर पुढे म्हणाला की, “मी माझ्या मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं? यावर मी याआधी अनेक मुलाखतींमध्ये बोललो आहे. माझ्या पत्नीनेही काल व्हिडिओमधून याबद्दल सांगितले आहे. त्यामुळे मी हे बोलून वेळ वाया घालवत नाही. मला इतकंच सांगायचं आहे की मी छत्रपती शिवरायांची भूमिका करतो. आतापर्यंत 6 सिनेमांमध्ये मी ती केली. आणि तरी माझ्या मुलाचा जहांगीर का प्रमुख प्रश्न आहे. माझ्या मुलाचा जन्म 2013 साली झाला. आज तो अकरा वर्षाचा झाला. हे ट्रोलिंग मला तेव्हा नाही झालं. हे आता होत आहे. त्यामुळे मला छत्रपती आतापर्यंत खूप काही दिलं. देशातील देशाबाहेरच्या लोकांचे प्रेम दिले. फक्त मराठीच नाहीतर मराठी लोकांचंही प्रेम दिले. पण आता या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला त्रास होत असेल, तर मी अत्यंत नम्रपणे सांगतो की, इथून पुढे मी भूमिका साकारणार नाही. कारण मी करत असलेलं काम तुम्ही काय याचा जर माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास होत असेल, तर वडील नवरा कुटुंब प्रमुख म्हणून मला हे जपणं फार महत्त्वाच आहे. मला याचं खूप वाईट वाटतंय कारण माझ्या मनात महाराजांबद्दलची भक्ती आहे. ती श्रद्धा आहे तेच भूमिकेतून मांडतो. अगदी माझ्या गाडीतही जिथे लोक गणपतीची मूर्ती ठेवतात. तिथे मी छत्रपती महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे. हा दिखावा नाही प्रेम आहे, श्रद्धा आहे. पण मी का सिद्ध करू लोकांना? त्यांना काय दिसतं मुलाचं नाव जहांगीर ठेवलं.

अशाप्रकारे चिन्मयने एक मोठा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलेला आहे. आणि त्यातून त्याचे मत परखडपणे मांडलेले आहे. परंतु त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना मात्र खूप दुःख झालेले आहेत. त्याने हा निर्णय मागे घ्यावा असे अनेकजण त्याला कमेंट करून सांगत आहेत.

हे देखील वाचा