Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘सुभेदार’बद्दल चिन्मय मांडलेकरांनी प्रेक्षकांना केले आव्हान; म्हणाले, ‘अनेक जण चित्रपट…’

महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासातील प्रत्येक पान मराठयांच्या अतुलनीय शौर्याने भरलेलं आहे. सुभेदार तान्हाजी मालुसरेंचा कोंढाण्यावरील पराक्रम, ही अशीच एक अद्वितीय सुवर्णगाथा सांगणारा ‘सुभेदार’ हा चित्रपट शुक्रवारी (25 ऑगस्ट) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी तमाम गर्दी केली आहे. अनेक चित्रपट गृह गच्च भरली आहेत. तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा या चित्रपटातून बघायला मिळत आहे. पण चित्रपट प्रदर्शित होऊन एक दिवस पूर्ण न होताच प्रेक्षकांच्या एका कृतीमुळे चिन्मय मांडलेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंबंधित चिन्मय मांडलेकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करून प्रेक्षकांना विनंती केली आहे.

चिन्मय मांडलेकर (Chinmoy Mandalakar) यांनी व्हिडिओ शेअर करताना कॅप्शमध्ये लिहिले की,”एक विनम्र आवाहन!” त्या व्हिडिओमध्ये बोलताना ते म्हणाले की, ” नमस्कार, जय शिवराय. ‘सुभेदार’ चित्रपट आज संपुर्ण महाष्टात आणि महाराष्टा बाहेर प्रदर्शित झाला आहे. अगदी पहिल्या शो पासून या चित्रपटाला महाराष्टातील शिवप्रेमींच आणि रसिक प्रेक्षकांचा चांगला असा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, एका गोष्टीसाठी विशेष आव्हान करत आहे.”

ते पुढे बोलताना म्हणाले की,”अनेक जण चित्रपट पडद्यावर पाहत आहेत आणि तो मोबाईलवर शूट करत आहेत. त्यातील काही दृश्य स्टेटसला टाकत आहेत किंवा पोस्ट करत आहेत. त्या सर्वांना कळकळीची विनंती आहे. कृपया असे करू नका. पडद्यावर दिसत असलेला चित्रपट शूट करणे कायद्याने गुन्हा आहे. आपण जे आपल्या शिवाजी महारांजांचा चित्रपट बघण्याचा आनंद घेत आहात. तो प्रत्येकाला घेऊद्या. त्यामुळे तुम्ही स्वत: चे सेल्फी काढ, तिकटचे फोटो काढा किंवा पोस्टरचे फोटो काढा आणि स्टेटसला टाका.पण चित्रपटाचा शेवट शुट करून तो सोशल मीडियावर पोस्ट करण टाळा.”

यादरम्यान, या चित्रपटात मुख्य भूमिका म्हणजेच तानाजी मालुसरेंची आहे. त्यांच्यावर आधारीत हा चित्रपट आहे. त्यांची भूमिका अभिनेता अजय पुरकर करताना दिसत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत पुन्हा चिन्मय मांडलेकर झळकले आहेत. तर जिजाऊ आईसाहेबांच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णीने केलेली पाहायला मिळत आहे. (Chinmoy Mandalakar challenged the audience about ‘Subhedar’)

अधिक वाचा-
‘कुठली माणसं…’ राष्ट्रीय पुरस्कारावरून आव्हाडांचा संताप, नेटकरी म्हणाले, ‘गरिबांना छळणार…’
सलील कुलकर्णीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘एकदा काय झालं’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान

हे देखील वाचा