Sunday, May 19, 2024

‘कुठली माणसं…’ राष्ट्रीय पुरस्कारावरून आव्हाडांचा संताप, नेटकरी म्हणाले, ‘गरिबांना छळणार…’

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा गुरूवारी (24 ऑगस्ट) नुकतीच करण्यात आली. हा पुरस्कार मनोरंजन विश्वातील सर्वात महत्वाचा मानला जातो. हा सोहळा दिल्लीत आयोजित करण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळ्यात दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन प्रमुख आकर्षन ठरला. त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले. तर त्याचवेळी ‘रॉकेट्री: द नांबी इफेक्ट’हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला आहे. पण यामध्ये ‘जय भीम’ या चित्रपटाला एकही पारितोषिक देण्यात आले नाही. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहेत. यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड खंत व्यक्त केली आहे.

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी सोशल मीडियावर एक ट्विट केले आहे. जे सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. ते ट्विट सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. त्यांनी ट्विट करताना लिहिले की, “राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समारंभ पार पडला. कोण कुठली माणसं निवड समितीमध्ये होती ते माहीत नाही. पण त्यांना कश्मीर फाईल्स या चित्रपटाला पारितोषिक द्यावंसं वाटलं. पण जय भीम या चित्रपटाचा त्या निवड समितीमधील सगळ्यांनाच विसर पडलेला दिसतोय. खरंतर लोकांच्या मनातील ह्या वर्षातील चित्रपट हा ‘जय भीम’ (Jai Bheem) हाच होता. लोकांच्या मनातील पारितोषिक हे ‘जय भीम’ चित्रपटालाच.”

यावर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. कमेंट करताना एकाने लिहिले की, “महाराष्ट्र द्रोही सरकार, गरिबांना छळणार सरकार…” तर दुलऱ्याने लिहिले की, “स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी किती विष कालवनार आनखी समाजात, हिच समाज विभाजनकारी निच निती वापरून एवढे वर्ष राज्य केलय तुम्हीं.” तर आनखी एकाने लिहिले की. “माणूस स्वतः हा न्यायप्रिय असला, तर तो अन्याय विरोधात कितीही कठीण लढाई असली तर शेवटपर्यंत लढतो. त्यात यशस्वी होतो,असे उत्कृष्ट चित्रन करणारा व समाजात सामाजिक न्यायाची लढाई निरंतर चालू ठेवण्यास प्रेरणा देणारा अप्रतिम चित्रपट.. “जय भीम”… याला कोणत्याही पुरस्काराची गरज नाही.”

दरम्यान, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात ‘जय भीम’ चित्रपटाला स्थान मिळालेलं नाही, यावरून जितेंद्र आव्हाड यांनी खोचक टीका केली आहे. भारतातील जातीय विषमता आणि त्यामुळे आदिवासी समूहाचा खडतड प्रवास आणि जगावं लागणरं गुन्हेगारांचं जीवन ‘जय भीम’ चित्रपटातून सर्वांसमोर मांडण्यात आले आहे. (NCP MLA Jitendra Awad expressed regret for not giving the National Award to the film ‘Jai Bheem’)

अधिक वाचा- 
सलील कुलकर्णीच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘एकदा काय झालं’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान
‘किन्नर बहू’ बनत रुबीनाने मिळवले चाहत्यांच्या मनात स्थान; जाणून घ्या तिचा यशस्वी प्रवास

हे देखील वाचा