Monday, July 21, 2025
Home बॉलीवूड आनंदाची बातमी! मोठ्या संकटातून बाहेर आली दिग्दर्शिका फराह खान, सोशल मीडियावरून दिली माहिती

आनंदाची बातमी! मोठ्या संकटातून बाहेर आली दिग्दर्शिका फराह खान, सोशल मीडियावरून दिली माहिती

प्रसिद्ध चित्रपट निर्माती आणि कोरियोग्राफर फराह खान कुंदर काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आली होती. मात्र, आता तिने चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. शनिवारी (११ सप्टेंबर) चाहत्यांसोबत एक व्हिडिओ शेअर करत तिने सांगितले की, ती आता कोरोनामुक्त झाली आहे. तिने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर तिचा कोरोना अहवाल शेअर केला होता.

फराह खान झाली कोरोनामुक्त
‘हॅप्पी न्यू इयर’ची दिग्दर्शिका फराहने पोस्ट केले की, “पाहा, हे सर्वात जास्त एक्सायटेड आहे की, आयव्हीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.” व्हिडिओमध्ये फराहचा एक गोंडस कुत्रा देखील दिसत आहे. ‘में हूं ना’, ‘ओम शांती ओम’ आणि ‘हॅप्पी न्यू इयर’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाणारी फराह खान कुंदरने १ सप्टेंबर रोजी कळवले होते की, कोरोनाच्या दोन्ही लस घेतल्यानंतरही ती कोरोनाबाधित आढळली होती.

फराह ‘सुपर डान्सर ४’ आणि ‘केबीसी १३’ मध्ये गेली होती
या दिवसांत फराह खान कुंदर एका कॉमेडी शोमध्ये परीक्षक आहे. फराह खान काही दिवसांपूर्वीच शिल्पा शेट्टीच्या डान्स रियॅलिटी शो ‘सुपर डान्सर ४’ च्या सेटवर शूट करण्यासाठी आली होती. शोचा हा भाग खूप धमाकेदार होता. ज्यात शिल्पा आणि फराहने खूप मजा केली. याशिवाय तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘कौन बनेगा करोडपती १३’ साठी एक विशेष भाग शूट केला आहे. अशा परिस्थितीत फराहची कोरोना पॉझिटिव्ह येण्याची बातमी अनेक सेलिब्रिटींसाठी चिंतेचे कारण बनू शकते.

मुंबईत कोरोनामुळे झाले अनेक मृत्यू
त्याचवेळी एका अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी मुंबईत ४४१ नवीन कोव्हिड-१९ प्रकरणे आणि पाच मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरातील संक्रमणाची संख्या ७,३४,३३७ आणि मृतांची संख्या १६,०११ वर गेली आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-ट्रोलर्सवर गरजली अर्शी खान, गणरायाच्या पूजेचे ‘हे’ फोटो केले होते पोस्ट

-‘बिग बॉस’च्या ‘या’ स्पर्धकांनी दिलाय जगाला निरोप; कोणी केली आत्महत्या, तर कोणाला आला हार्ट अटॅक

-कंगना नव्हे, तर ऐश्वर्याला ‘थलायवी’मध्ये पाहू इच्छित होत्या जयललिता; सिमी गरेवालने केला खुलासा

हे देखील वाचा