बॉलिवूडमध्ये फॅशनच्या बाबतीत जागरूक असणाऱ्या कलाकारांचे नाव घ्यायचे झाले, तर त्यामध्ये दिग्दर्शक करण जोहर आणि रणवीर सिंग हे आघाडीवर येतात. हे दोन्ही कलाकार सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय असतात. त्यांच्या इंस्टाग्रामवर नजर टाकली, तर त्यावर फॅशन स्टाईलने भरलेले फोटोच फोटो पाहायला मिळतील. दोघेही त्यांच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असतात. सध्या करण त्याच्या व्हिडिओंमुळे माध्यमांचे लक्ष वेधताना दिसत आहे.
प्रसिद्ध कोरिओग्राफर तसेच चित्रपट निर्माती फराह खान (Farah Khan) आणि करण जोहर (Karan Johar) यांची मैत्रीही जगजाहीर आहे. ते दोघेही एकमेकांची थट्टा मस्करी करताना दिसतात. फराहने नुकताच तिचे मित्र असलेल्या करण आणि फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) याच्यासोबत एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये करण आणि फराह एकमेकांना चिडवताना दिसत आहेत.
फराह खानने व्हिडिओ केला शेअर
फराह खान (Farah Khan) हिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला सुरुवात होताच करण जोहर (Karan Johar) कॅमेऱ्याकडे पाठ करून पोझ देतो. त्यानंतर फराह म्हणाली की, “हा कोण आहे? हा…” यानंतर लगेच करण हसत हसत मागे फिरतो आणि फराह म्हणते की, “ये देवा हा करण जोहर आहे?” त्यानंतर ती करणला विचारते की, त्याने काय परिधान केले आहे? त्यावर करण म्हणतो की, “मी माझ्या ओव्हरसाईज बॅलेंसिएगा सिल्ह्यूटमध्ये आहे.”
View this post on Instagram
फराहने केली करणची बोलती बंद
यानंतर करण तिला म्हणाला की, “चला मी तुम्हाला या ब्रँडबद्दल सांगतो.” यावर फराह उत्तर देते की, “ठीक आहे, आम्हाला ऐकायचे नाही.” यानंतर फराह मनीषकडे कॅमेरा फिरवते. मनीष म्हणतो की, “ठीक आहे, मला वाटते की, तो सर्वात महागडे कपडे वापरू शकतो आणि आपल्या कपड्यांबद्दल सांगत असतो. मात्र, मी त्याच्यापेक्षा चांगला दिसतो.” फराहने यावर उत्तर दिले की, “तू खूपच चांगला दिसत आहेस. कारण, तू खूप हँडसम आहेस.”
करण जोहर फराहला काय म्हणाला?
यानंतर फराहने करणकडे कॅमेरा फिरवला आणि म्हटले की, “तू पण हँडसम आहेस करण.” यावर प्रत्युत्तर देत करण म्हणतो की, “मनीष हँडसम आहे, मला हे स्वीकारावे लागेल. मात्र, आपण कोणाकडे पाहत आहोत. ग्लॅमरस आयकॉन फराह खान. ती स्लिम दिसत आहे आणि जमीन सपाट आहे.” करण जोहरच्या या वक्तव्यानंतर फराह हसते आणि म्हणते की, “ओके, बाय.”
सोशल मीडियावर या व्हिडिओचीच चर्चा रंगली आहे. या व्हिडिओवर नेटकरी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘पच्चीस दिन में पैसा ट्रिपल’, अक्षयच्या सिनेमाच्या रिमेकचा बॉक्स ऑफिसवर धमाका, निर्मात्यांकडून कौतुक
प्रेग्नंट आहे की नाही? खरं काय ते ‘बेबो’ने एकदाचं सांगूनच टाकलं; म्हणाली, ‘उफ्फ! मी प्रेग्नंट…’