प्रसिद्ध कोरिओग्राफर पुनीत पाठक याने त्याच्या दमदार नृत्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. एक उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर असणारा पुनीत एक उत्तम अभिनेता देखील आहे. पुनीतने त्याच्या अभिनयाचे कौशल्य काही चित्रपटांमधून प्रेक्षकांना दाखवले आहे. आपल्या डान्समुळे सतत चर्चेत असणारा पुनीत सध्या एका वेगळ्याच कारणामुळे गाजताना दिसत आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
नुकताच पुनीत (punit pathak) याचा त्याच्या बेडरूमधला एक प्राव्हेट व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये तो आपल्या पत्नी निधीसोबत रोमांन्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये पुनीत त्याच्या बेडरूममध्ये दिसत असून, तो निधीचा दुपट्टा पकडून तिला जवळ ओढताना दिसत आहे. हा व्हिडिओ निधीच शूट करत असल्यामुळे यात निधी दिसत नसली तरी, ती असल्याचे सर्वांच्याच लक्षात येत आहे. या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंडला ‘राता लंबिया’ हे शेरशाह सिनेमातील गाणे वाजत आहे. अतिशय रोमँटिक असणारा हा व्हिडिओ पुनीतच्या बायकोने निधीने तिच्या इंस्टग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये तो आपली पत्नीसोबत खासगी क्षणांचा आनंद घेत आहे. हा व्हिडिओ शेअर झाल्यानंतर बघता बघता व्हायरल झाला. पण या व्हिडिओमुळे त्यांना ट्रोलही केले जात आहे. तर काही नेटकऱ्यांना पुनीतचा हा व्हिडिओ आवडत असून, ते तशा कमेंट्स देखील करत आहे.
पुनीत आणि निधी या दोघांची पहिली भेट डान्स रियॅलिटी शो ‘झलक दिखला जा’ च्या सेटवर झाली. त्यानंतर त्यांची मैत्री आणि मग ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी ११ डिसेंबर रोजी लग्न केले.
पुनीत एका डान्स शोमध्ये सहभागी होऊन या क्षेत्रात एन्ट्री मारली. त्याचे डान्स कौशल्य पाहून, अनेकांनी त्यांना कोरिओग्राफीच्या ऑफर दिल्या. आज पुदित डान्स क्षेत्रातील मोठे नाव बनला असून, तो अनेक शोमध्ये परीक्षकांची भूमिका साकारताना दिसतो. (choreographer punit pathak wife shares their private romantic video on instagram)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रथमेश परबला झालीये ‘लग्नाची घाई’, जाणून घ्या कोण आहे होणारी नवरी?
जसप्रीत बुमराहसोबत जोडलं जायचं राशी खन्नाचं नाव, तर आज ‘इतक्या’ संपत्तीची मालकीण आहे अभिनेत्री