Tuesday, July 9, 2024

राडाच ना! इंटरनेटवर फक्त छोट्या ‘गंगुबाई’चीच हवा; ऍक्टिंगमध्ये आलिया भट्टलाही देतेय टक्कर

बहुप्रतिक्षित ‘गंगुबाई काठियावाडी‘ या सिनेमात अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या कारकिर्दीत साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका साकारणार आहे. हा सिनेमा बनून प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या सिनेमाचा ट्रेलरही प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे आणि यामध्ये आलियाच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून चांगलीच दाद मिळाली आहे. सध्या ‘गंगुबाई’चा फिव्हर सर्वांवरच चढला आहे. मात्र, आलियालाही टक्कर देणारी छोटी गंगुबाई सध्या चांगलीच चर्चेत आहे. या छोट्या गंगुबाईचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर भलताच व्हायरल होत आहे, जो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

खरं तर या छोट्या गंगुबाईचा जो व्हिडिओ व्हायरल होत आहे, त्यामध्ये ही छोटी गंगुबाई आलियाच्या डायलॉगवर लिप- सिंक करत आहे. विशेष म्हणजे, या छोट्या मुलीने आलिया भट्टच्या (Alia Bhatt) भूमिकेत दिसण्यासाठी पांढऱ्या रंगाची साडी आणि मोठी टिकली लावली आहे.

व्हिडिओ होतोय व्हायरल
या छोट्या गंगुबाईचा व्हिडिओ शिवानी जे खन्ना या नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओत दिसणाऱ्या मुलीचं नाव कियारा खन्ना (Kiara Khanna) आहे. तिचा हा व्हिडिओ प्रेक्षकांमध्ये जबरदस्त पसंत केला जात आहे. या व्हिडिओत कियाराने छोट्या गंगुबाईप्रमाणे हात जोडून पोझ देताना दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, “हा व्हिडिओ क्यूट आलिया भट्टला डेडिकेट करते. तुम्हाला भेटणे आणि तुमच्यासोबत काम करणे एका स्वप्नासारखं होतं. गंगुबाई झिंदाबादसाठी आमच्या शुभेच्छा. आशा करू की, हा अभिनय तुम्हाला आवडेल.” या व्हिडिओवर नेटकरी कमेंट्सचा पाऊस पाडत या चिमुकल्या मुलीची प्रशंसा करण्यापासून स्वत:ला रोखू शकत नाहीयेत.

या व्हिडिओला आतापर्यंत १ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच २५ हजारांहून अधिक लाईक्सचाही पाऊस पडला आहे.

‘गंगुबाई काठियावाडी’ हा सिनेमा येत्या २५ फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा प्रसिद्ध लेखक हुसैन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. यामध्ये आलियासोबत अजय देवगण आणि विजय राज महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा