चित्रपटगृहातच प्रदर्शित होणार संजय लीला भंसाळीचा ‘गंगुबाई काठियावाडी’; पाहिजे तितकी वाट बघायला निर्मात्यांची तयारी


संजय लीला भन्साळी यांचा बहुप्रतिक्षिप्त चित्रपट ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाची सगळे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. याआधी अशी बातमी समोर आली होती की, हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. पण संजय लीला भन्साळी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी जेवढा वेळ लागेल, तेवढी वाट बघायला तयार आहेत. अनेक निर्मात्यांनी या परिस्थितीत त्यांचे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट देखील ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे, अशा बातम्या येत होत्या. पण आता निर्मात्यांनी या अफवांना पूर्णविराम दिला आहे.( Gangubai kathiyawadi movie will not release on OTT platform)

‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अशी घोषणा केली आहे की, हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर नाही तर चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. स्पॉटबॉयच्या माहितीनुसार, संजय लीला भन्साळी हे त्यांच्या प्रेक्षकांना नाराज करणार नाही. त्यांना असे वाटते की, या चित्रपटात ज्या प्रकारे सीन आणि इमोशन आहे ते मोठ्या पडद्यावर बघितले पाहिजे.

हाती आलेल्या माहितीनुसार, संजय लीला भन्साळी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यासाठी कितीही वेळ वाट बघायला तयार आहेत.

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट मुंबईमधील माफिया क्वीन गंगुबाई काठियावाडीवर आधारित आहे. जी सुरुवातीला एक सेक्स वर्कर असते आणि नंतर ती एक अंडरवर्ल्ड डॉन बनते. हा चित्रपट लेखक हुसैन जैदी यांचे पुस्तक ‘माफिया क्वीन ऑफ मुंबई’ वर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेत्री आलिया भट्ट ही मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचा पोस्टर प्रदर्शित झाला आहे. यात आलिया भट्टचा फर्स्ट लूक जबरदस्त दिसत आहे.

गंगुबाई काठियावाडी ही एक मुंबईमधील एक चर्चित कोठेवाली होती. जिच्या पतीने तिला केवळ ५०० रुपयांसाठी विकले होते. या चित्रपटात तिचा संघर्ष दाखवला आहे. अगदी लहान वयात तिचे लग्न होते. नंतर तिचा पती पैशासाठी तिला विकतो. तिचा जीवन प्रवास दाखवला आहे. संजय लीला भन्साळी या चित्रपटाबाबत खूप उत्साहित आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नऊ वर्षांपूर्वी विकी कौशलने दिले होते त्याचे पहिले ऑडिशन; आज आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये केली जाते गणना

-आजीच्या निधनाने पुरती तुटली आहे अनन्या पांडे; महिला दिनानिमित्त शेअर केली होती आजीसोबतची शेवटची पोस्ट

-जोर धरू लागलीय फरहान अख्तरनच्या ‘तूफान’ला बॉयकाट करण्याची मागणी; ट्विटरवर ट्रेंड होतोय #boycotttoofaan


Leave A Reply

Your email address will not be published.