Wednesday, June 26, 2024

Shweta Tiwari Christmas preparation 2023: श्वेता तिवारीने मुलगा रेयांशसोबत केला ख्रिसमसची तयारी, पाहा भन्नाट फाेटाे

भारतासह संपूर्ण जगभरात ख्रिसमस या सणाची मोठ्या उत्साहात तयारी केली जात आहे. मनोरंजन विश्वातील कलाकार देखील ख्रिसमसची तयारी करत आहेत. ख्रिसमस जवळ आला असून लोकांनी या सणाची तयारी सुरू केली आहे. बॉलीवूडशिवाय टेलिव्हिजन स्टार्सनेही ख्रिसमस 2023 ची तयारी सुरू केली आहे. प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra), परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) आणि इतर सेलिब्रिटींपाठोपाठ टेलिव्हिजन क्वीन श्वेता तिवारीनेही ख्रिसमसची तयारी सुरू केली. तिने ख्रिसमस ट्री सजवण्यास सुरुवात केली आहे. श्वेता तिवारीने ख्रिसमसच्या तयारीची एक झलक इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

श्वेता तिवारी (Shweta Tiwari Christmas preparation) सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून चाहत्यांशी कनेंट राहण्याचा प्रयत्न करत असत. श्वेता तिवारीने नुकतेच ख्रिसमसच्या तयारीची एक झलक इंस्टाग्रामवर (Shweta Tiwari Instagram) शेअर केली आहेत.जी चांंगलीच चर्चेत येत आहे. श्वेता तिवारीने इंस्टाग्रामवर अनेक फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे. या फोटोंमध्ये श्वेता तिवारी आणि तिचा मुलगा रेयांशही दिसत आहेत. या फोटोंमध्ये श्वेता तिच्या मुलासोबत ख्रिसमस ट्री सजवत आहे.

फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, श्वेता तिवारी अर्ध्या सजवलेल्या ख्रिसमसच्या झाडाजवळ उभी आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ती तिचा सात वर्षांचा मुलगा रेयांशसोबत (Reyansh) पोज देत आहे, जो सजावटीचा आनंद घेत आहे. श्वेता तिवारी आणि तिचा मुलगा रेयांश यांनी ख्रिसमस ट्रीसह घराची सजावट केली आहे. यादरम्यान श्वेता तिवारी लाल आणि पांढरा स्वेटर आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केलेली दिसत आहे. तर त्यांचा मुलगा रेयांश याने काळ्या रंगाचा स्वेटर आणि निळी जीन्स परिधान केली आहे. (Shweta Tiwari decorates her tree beautifully along with son Reyansh ahead of Christmas 2023)

श्वेता तिवारी आणि रेयांश यांच्या ख्रिसमसच्या (Christmas) तयारीवर चाहत्यांनी भरभरून प्रेमचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी ख्रिसमस ट्री आणि घराच्या सजावटीचे खूप कौतुक केले आहे. यासोबतच चाहत्यांनी रेयांशच्या मेहनतीचं आणि समर्पणाचंही कौतुक केलं आहे. ख्रिसमसच्या सेलिब्रेशनच्या तयारीदरम्यान चाहत्यांना श्वेता तिवारीचा लूकही खूप आवडला आहे. मोकळ्या केसांसह श्वेताचा लूक अगदी साधा आहे. लोक तिच्या फिटनेस, सौंदर्य आणि साधेपणाचे कौतुक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari)

श्वेता तिवारीच्या कामाविषयी बोलायचं झालं तर, श्वेता तिवारीने ‘कसौटी जिंदगी की’, ‘मैं हूं अपराजिता’ आणि ‘बेगुसराय’ या चित्रपटातून टीव्ही इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला आहे. तिचे लाखे चाहते आहेत. (christmas 2023 Famous television actress shweta tiwari gets into festive mood decorates tree with daughter palak and son reyansh )

आधिक वाचा-
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीविरोधात अटक वॉरंट जारी? एकदा वाचा काय आहे प्रकरण
‘त्या’ भामट्याने थेट जेलमधून पुन्हा लिहिले जॅकलिनला प्रेमपत्र; म्हणाला, ‘मी तुला भेटण्यासाठी…’

हे देखील वाचा