Sunday, May 19, 2024

ऐश्वर्या राय बच्चनने मुलगी आराध्यासोबत साजरा केला ख्रिसमस, पाहा भन्नाट फाेटाे

बॉलीवूड कलाकार प्रत्येक सण एका खास पद्धतीने साजरे करण्यासाठी ओळखले जातात, परंतु जेव्हा ख्रिसमस येतो तेव्हा संपूर्ण इंडस्ट्री अनाेख्या रंगात रंगलेला दिसते आणि आपल्या मजेदार शैलीने लोकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडत नाही. अशातच आता रविवारी (दि. 25 डिसेंबर)ला ऐश्वर्या राय बच्चनने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आणि चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. या फोटोमध्ये ऐश्वर्यासाेबत तिची मुलगी आराध्याही दिसत आहे. यादरम्यान माय-लेकीची जोडी हातात पुष्पगुच्छ घेऊन दिसत आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या (aishwarya rai bachchan) हिने आपल्या प्रियजनांना मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा देत हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले, “मेरी ख्रिसमस. या ख्रिसमसमध्ये देव सर्वांना प्रेम, शांती, आनंद आणि उत्तम आरोग्याच्या रूपाने आशीर्वाद देवो.” अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या फाेटाेला लोक पसंत करत आहेत आणि आपली प्रतिक्रिया देतानाच संपूर्ण बच्चन कुटुंबाला ख्रिसमसच्या शुभेच्छा देत आहेत.

त्याचवेळी ऐश्वर्या रायचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती मुंबई विमानतळाच्या आत जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर ऐश्वर्या ख्रिसमसच्या सुट्टीत मुलगी आणि वडिलांसोबत गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अलीकडेच, प्रो कबड्डी लीग 2022 च्या अंतिम सामन्यात ऐश्वर्या आणि आराध्याची जोडी दिसली, जिथे आराध्याने आई आणि वडील अभिषेक बच्चन यांच्यासोबत जयपूर पिंकपाथर संघाने लीग जिंकल्यानंतर जबरदस्त नृत्य केले.

ऐश्वर्या राय बच्चनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. यापुर्वी, ती मणिरत्नमच्या ड्रीम फिल्म पोन्नियन सेल्वन पार्ट-1 मध्ये दिसली होती, ज्यामध्ये तिने राणी नंदिनीची भूमिका साकारली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या दमदार यशानंतर निर्मात्यांनी पीएस-१ च्या दुसऱ्या भागाची तयारी सुरू केली आहे. (bollywood actress aishwarya rai bachchan celebrated christmas with daughter aaradhya like this shared picture and wishes merry christmas to fans 23)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
चित्रपटापासून ते राजकारणापर्यंतचा प्रवास करणारी ‘नगमा’, सलमान खानसोबत केले होते बॉलिवूड पदार्पण, आज आहे करोडोंची मालकीण

लग्न होऊनही जगापासून का लपवले जय भानुशाली आणि माही वीज यांनी त्यांचे नाते? केला मोठा खुलासा

हे देखील वाचा